डॉ सतीश भदाणे,पोलीस नायक
चोपडा तालुका (प्रतिनिधी) :-
दि.९ सप्टेंबर २३ शनिवार
तालुक्यातील वर्डी येथील स्व.व्यंकटराव त्र्यंबकराव पाटील यांची नात व चांदसर हायस्कुलचे उपशिक्षक प्रकाशचंद्र व्यंकटराव साळुंखे यांची कन्या कु.कार्तिकी साळुंखे हिची राज्य लोकसेवा आयोगामार्फत राज्य विक्रीकर निरीक्षक (एस.टी.आय) पदी नुकतीच निवड करण्यात आली आहे.
तालुक्यातील वर्डी येथील चांदसर हायस्कुलचे उपशिक्षक प्रकाशचंद्र व्यंकटराव साळुंखे यांची कन्या कु.कार्तिकी साळुंखे हिने जळगांव येथील एस एस बी टी कॉलेजमधुन बी.ई चे शिक्षण पूर्ण केले असून कार्तिकी साळुंखे हिची सन २0१८ मध्ये सहायक गुप्तवार्ता अधिकारी (एस आय डी) पदी निवड झाली होती.राज्य विक्रीकर निरीक्षकपदी नुकतीच जळगांव येथे रुजु झालेली कु.कार्तीकी साळुंखे ही अजुनही तिचे मोठ स्वप्न पहात राज्य सेवेची तयारी करत आहे.कु.कार्तीकीच्या सदरील यशाबद्दल तिचे चोपडा व वर्डी परिसरात सर्वत्र कौतुक केले जात आहे.