डॉ सतीश भदाणे,पोलीस नायक
चोपडा तालुका (प्रतिनिधी) :-
दि.११ सप्टेंबर २३ सोमवार
शहरातील मेन रोडवरील कृषी केंद्रासमोर लावलेल्या गाड्या तसेच गोल मंदिर परिसरात दोन चार चाकी वाहने अशा तीन गाड्यांच्या काचा रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तींकडून फोडण्यात आल्याची घटना नुकतीच समोर आली आहे.
दरम्यान हि घटना सकाळी लक्षात आल्याने गाडी मालकांकडून चोपडा पोलीस स्टेशनला घटनेची माहिती कळविण्यात आली असून सदरील घटनेबाबत पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून तपास करून गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.सदरहू अशा घटनांना आळा बसवण्यासाठी पोलिसांनी विशेष करून लक्ष दिले पाहिजे असे वाहनधारक मयुर अग्रवाल यांनी म्हटले आहे.