आदिवासींच्या विविध मागण्यांसाठी प्रकल्प कार्यालयावर वंचित बहुजन आघाडी व आदिवासी विद्यार्थी महासंघातर्फे आंदोलन
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१२ सप्टेंबर २३ मंगळवार
आदिवासी बांधवांच्या विविध मागण्यांसाठी आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयावर वंचित बहुजन आघाडी व अखिल भारतीय आदिवासी विद्यार्थी महासंघातर्फे वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे व अखिल भारतीय आदिवासी विद्यार्थी महासंघाचे अध्यक्ष साहिल तडवी यांच्या नेतृत्वात आमरण उपोषण आंदोलनाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी आंदोलकांनी विविध घोषणा देऊन प्रकल्प कार्यालय परिसर दणाणून सोडला.दरम्यान उपोषणाच्या पहिल्याच दिवशी प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांनी उपोषणस्थळी भेट देऊन सर्व मागण्या संदर्भात सकारात्मक चर्चा केली त्यामुळे पुढील उपोषण तूर्त स्थगित करण्यात आले. सदरहू आदिवासी विकास प्रकल्प यांचे कार्यालयातील अधिकारी आदिवासी पाड्यांवर न फिरता दलालामार्फत सर्व कामे करीत असल्यामुळे आदिवासींपर्यंत विविध योजनांचा लाभ पोहोचत नसून संबंधित अधिकारी कार्यालयात आलेल्या आदिवासी बांधवांशी उर्मट पणाची वागणूक देत आहेत तसेच आदिवासींसाठी सुरू असलेले वनदावे तात्काळ मंजूर करून सातबारा त्यांच्या नावावर करण्यात यावा व ग्रामपंचायत मार्फत घरकूल योजनेचा लाभ त्यांना देण्यात यावा अशा मागण्या या आंदोलनादरम्यान करण्यात आल्या.यावेळी जिल्हा महासचिव दिनेश इखारे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा वंदना सोनवणे,कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष बालाजी पठाडे,जिल्हा संघटक राजेंद्र बारी,जिल्हा सचिव दिपक मेघे, यावल तालुकाध्यक्ष भगवान मेघे,तालुका महासचिव राजेश गवळी,जिल्हा उपाध्यक्ष मोहम्मद शफी,तालुका उपाध्यक्ष सागर झाल्टे,मेजर देवदत्त मकासरे,दिलीप भालेराव,कामगार आघाडी तालुकाध्यक्ष सुरेश बोदडे,संतोष तायडे,तालुका उपाध्यक्ष शरद अडकमोल,भुषण साळुंके, बाबुलाल पटेल,बिलालसिंग पारा,नरसिंग बारेला,हमीद तडवी,तुराब तडवी,शफी खान,श्याम डंगोरे,बिलसिंग पावरा,प्रतिभाताई कोळी,रोहन निकम,भुषण भालेराव,भानुदास महाजन,बळीराम कोळी,धीरज मेघे,जग्गु बारेला,प्यारसिंग बारेला,संभासिंग बारेला,आसाराम बारेला,रामदेव बारेला,रमेश जाधव,रजनीकांत डोळे आदि पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.