Just another WordPress site

यावल येथे युवक काँग्रेस तर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस बेरोजगार दिवस म्हणून साजरा

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.१७ सप्टेंबर २३ रविवार

येथील युवक काँग्रेस रावेर यावल विधानसभातर्फे प्रदेश युवक काँग्रेसचे आदेशानुसार व जळगाव जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांच्या सुचणेप्रमाणे व प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार उल्हास पाटील,आमदार शिरीष चौधरी,काँग्रेस कमेटी तालुकाध्यक्ष प्रभाकर सोनवणे,शहराध्यक्ष कदिर खान यांचे मार्गदर्शनखाली देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित बेरोजगार दिवस म्हणुन साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमात रावेर विधानसभा क्षेत्र युवक अध्यक्ष फैजान शाह यांनी चहा बनवून नागरिकांना पिण्यास दिली तसेच नागरिकांना आश्र्वस्त करून सांगितले की,आज आपल्या देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाची सत्ता असून मागील आठ वर्षापासून आजपर्यंत युवकांना रोजगार देण्यापासून वंचित ठेवण्याचे काम भाजपा सरकारने केले आहे.भाजपा सत्तेत आले असतांना मोदी यांनी देशातील दोन कोटी बेरोजगार युवकांना प्रतिवर्ष रोजगार देऊ असे खोटे आश्वासन देऊन मायबाप जनतेला मूर्ख बनवले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशाची सुत्रे सांभाळण्यास नऊ वर्षाचा कालावधी झाला असुन देखील देशातील युवा आजही रोजगारासाठी अपेक्षित आहे.बेरोजगारी हा आपल्या देशाचा प्राथमिक प्रश्न असून भाजपा सरकार नवनवीन अजेंडे चालवून दाबण्याचे काम करत आहे परंतु देशाच्या या गंभीर प्रश्नावर काँग्रेस सतर्क असून नेहमीच जनतेच्या व युवकांच्या प्रश्नावर लक्ष वेघण्यासाठी काम करणार आहे.या कार्यक्रमास विधानसभा क्षेत्र अध्यक्ष फैजान शाह,कफिल खान,आदिल शेख,अनवर शेख,नेहाल पटेल,इब्राहिम सय्यद,आदिल सय्यद,जाबिर सय्यद,अरबाज खान आणि युवक काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.