Just another WordPress site

वड्री गावातील विषारी हातभट्टी गावठी दारूबंदीसाठी सरपंचांनी दिले पोलिसांना निवेदन

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.१७ सप्टेंबर २३ रविवार

तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या अगदी पायथ्याशी असलेल्या वड्डी या गावात गेल्या अनेक दिवसांपासुन मानवी जिवनास अत्यंत धोकादायक अशी हातभट्टी गावठी दारूची खुलेआम विक्री होत असुन या दारूच्या आहारी जावुन अनेक आदीवासी तरुणांचे जिवनावर विपरीत पारिणाम होत असुन त्यांचे आयुष्य उद्धवस्त होत आहे.परिणामी सदरील विषारी हातभट्टी गावठी दारूची विक्री पोलीस प्रशासनाने तात्काळ बंद करावी अशा मागणीचे निवेदन वड्री गावचे सरपंच अजय भालेराव व आदीवासी तरूणांच्या वतीने पोलीस निरिक्षक यावल यांना नुकतेच देण्यात आले आहे.

सदरील निवेदनात आदिवासी तरुणानी म्हटले आहे की,वड्री गावात खुलेआम सार्वजनिक ठीकाणी अत्यंत विषारी पदार्थानी बनविण्यात येत असलेली हातभट्टी गावठी दारू विकली जात असुन या दारूमुळे तरूणांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.परिणामी दारूच्या आहारी गेलेल्या तरूणांकडून गावात भानगडी व वाद उत्पन्न होत असल्याने यामुळे गावाची कायद्या सुव्यवस्था धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.तरी पोलीस प्रशासनाने सदरील विषारी हातभट्टी गावठी दारूच्या विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करून गावातील होणारी दारू विक्री तात्काळ थांबवावी अशी मागणी करण्यात आली आहे.सदरील निवेदनावर वड्री गावाचे प्रथम नागरीक सरपंच अजय भागवत भालेराव, बशीर परवान तडवी,असलम हसन तडवी,हमीद निजाम तडवी व फकीरा अरमान तडवी यांच्या स्वाक्षरी आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.