यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-तालुक्यातील डोंगर कठोरा येथून नुकतेच स्वेच्छा निवृत्ती घेतलेले दिवाकर सरोदे व सुलोचना सरोदे या दाम्पत्याने त्यांच्या कार्यकाळात प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या सहकाऱ्यांचे मनापासून आभार आभार व्यक्त केले आहे.त्यांच्या स्वेच्छा सेवा निवृत्तीची रुखरुख त्यांच्या मनात कायमची घर करून गेली आहे.त्यांनी त्यांच्या सेवा काळात केलेल्या चांगल्या कार्याबाबत त्यांच्या सहकाऱ्यांकडून आजही गौरवोद्गगार केला जात आहे.यात “एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंध”या उक्तीनुसार त्यांनी आपल्या कार्यकाळात प्रत्येकाला सहकार्याच्या माध्यमातून योगदान दिलेले आहे.अशा या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची उणीव आम्हाला सदोदित जाणवेल अशी भावना त्यांच्या सहकाऱ्यांनी बोलून दाखविली आहे.
याबाबत त्यांचे दोन शब्द त्यांच्याच विचारातून बघूया…………..जवळजवळ 36 पेक्षा जास्त वर्ष शिक्षक म्हणून सेवा केल्यानंतर सप्टेंबर 2022 अखेर मी व माझी सहचरणी दोघांनी स्वेच्छा सेवानिवृत्ती घेतली.त्यामुळे अनेकांनी आमच्यावर पुढील आयुष्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव केला.अनेकांनी फोन करून अथवा व्हाट्सअपच्या माध्यमातून किंवा व्हाट्सअप स्टेटस च्या रूपाने भरभरून आणि भावनिक शुभेच्छा दिल्या. सर्व शुभेच्छा ऐकून तथा वाचून कंठ दाटून येत आहे.काही वर्ष शिल्लक असताना मी व माझी पत्नी दोघांनीही कौटुंबिक आग्रहास्तव हा निर्णय घेतला.काहींना हा निर्णय खटकलाही असेल.परंतु आम्ही घेतलेल्या या निर्णयामुळे आम्हाला दुःख मुळीच वाटत नाही.दुःख फक्त या गोष्टीचं वाटतयं की शिक्षक म्हणून काम करत असताना तुमच्या सारख्या कोणत्यातरी निमित्ताने आयुष्याच्या एखाद्या वळणावरती भेटलेल्या व्यक्तींसोबत आपण दुरावलो तर जाणार नाही ना?आपल्यासारख्या प्रिय माणसांसोबत कोणत्यातरी निमित्ताने जुळलेला ऋणानुबंध माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी जपण्याचा प्रयत्न करेन.आपले प्रेम, स्नेह आणि विश्वास यांचा अमुल्य ठेवा,मनाच्या गाभाऱ्यात कायम जतन राहिल. आपण आमच्या स्वेच्छा निवृत्तीनिमित्त प्रत्यक्ष,अप्रत्यक्ष रुपाने विविध माध्यमातून जो शुभेच्छारुपी वर्षाव केला त्यासाठी आम्ही आपले मनापासून धन्यवाद व्यक्त करतो….!!
धन्यवाद…!!!! ????????
श्री. दिवाकर पुंडलिक सरोदे
सौ. सुलोचना दिवाकर सरोदे