यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२२ सप्टेंबर २३ शुक्रवार
येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात भारत सरकारच्या आयुष्यमान भव मोहिमे अंतर्गत तसेच कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत विद्यार्थी विकास विभागामार्फत महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ.संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य तपासणी शिबिर नुकतेच घेण्यात आले.
यावेळी ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ.वैशाली निकुंभ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना अवयव दान,रक्तदान,एच.आय.व्ही. एड्स आजाराविषयी जनजागृती व रेड रीबन क्लबबद्दल माहिती दिली.प्रसंगी यावल ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी समुपदेशक वसंतकुमार संधानशिव,प्रयोगशाळा तंत्रज्ञ नाना घोडके,रवींद्र माळी,छाया कोळी,नंदिनी पाटील,पवन जगताप यांच्याकडून २६१ विद्यार्थी,विद्यार्थिनीची आरोग्य तपासणी व ४०विद्यार्थी,विद्यार्थीनीची रक्तगट चाचणी करण्यात आली.या शिबिरात महाविद्यालय उप प्राचार्य प्रा.अर्जुन पाटील, उपप्राचार्य प्राध्यापक एम.डी.खैरनार,प्रा.संजय पाटील,विद्यार्थी विकास विभागप्रमुख डॉ.सुधीर कापडे,डॉ.हेमंत भंगाळे,डॉ.आर.डी.पवार,डॉ. पी.व्ही.पावरा यांच्या उपस्थितीत अवयवदानाची प्रतिज्ञा घेण्यात आली.शिबिर यशस्वीतेकरीता प्रा.मयुर सोनवणे,प्रा.सुभाष कामडी,डॉ.संतोष जाधव,प्रा.नरेंद्र पाटील,प्रा.मिलिंद मोरे,प्रा.प्रशांत मोरे,प्रा.छात्रसिंग वसावे,प्रा.अर्जुन गाढे,प्रा.अक्षय सपकाळे,प्रा.प्रतिभा रावते,डॉ.निर्मला पवार, डॉ.वैशाली कोष्टी,प्रा.रजनी इंगळे,मिलिंद बोरघडे,संतोष ठाकूर यांचे सहकार्य लाभले.