Just another WordPress site

यावलसह परिसरात पाचव्या दिवसी ३२ मंडळाच्या भक्तांनी दिला श्रीगणेशास निरोप

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.२४ सप्टेंबर २३ रविवार

“गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या” जयघोषाने काल दि.२३ सप्टेंबर रविवार रोजी शहरातील २० तसेच तालुक्यातील डांभुर्णी येथील सहा श्रीगणेश मंडळाच्या वतीने व नायगाव आणी कोरपावली येथील एक गाव एक गणपती आणि दहिगाव येथील तिन अशा तालुक्यातील ९२ श्रीगणेश मंडळा पैकी एकूण ३२ गणेश मंडळाच्या वतीने ढोल,ताशे,झांज आणी बॅंड पथकांच्या सुमधुर तालावर तरूण गणेश भक्तांनी बेधुंद नाचत श्रीगणेशाला उत्साहाच्या वातावरणात निरोप देण्यात आला.

यानिमित्ताने पाचव्या दिवसी विघ्नहर्त्या श्रीचे विर्सजन दरम्यान कायदा सुव्यवस्था राखण्याकामी अप्पर पोलिस अधिक्षक चंद्रकांत गवळी हे प्रामुख्याने उपस्थित होते.त्याचप्रमाणे विभागीय पोलीस अधिकारी डॉ.कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली यावल पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर,सहाय्यक पोलीस निरिक्षक विनोदकुमार गोसावी,जळगाव नियंत्रण कक्षाचे सहाय्यक पोलिस निरिक्षक आसाराम मनोरे,पोलीस उपनिरिक्षक सुनिल मोरे,पोलीस उपनिरिक्षक अविनाश दहिफळे,पोलीस उपनिरिक्षक मुजफ्फर पठान यांच्यासह १o पोलीस उपनिरिक्षक आणी २७५ पोलीस कर्मचारी,एक एसआरपी पथक,एक आरसीपीचे पथक व १५० गृहरक्षक दलाचे कर्मचारी यांचा मोठा बंदोबस्त या पाच दिवसाच्या श्रीगणेशाच्या विर्सजना दरम्यान ठेवण्यात आला.यावेळी यावल शहरात गणपती बाप्पाला अतिशय उत्साहाच्या वातावरणात निरोप देण्यात आला.यावल शहरातील गणपती विर्सजनाची मिरवणुक रात्री उशीरापर्यंत शांततेच्या वातावरणात काढण्यात आली.आज दि.२४ सप्टेंबर रविवार रोजी साकळी गावातील तिन श्रीगणेश मंडळाच्या वतीने श्रीचे विर्सजन तसेच तालुक्यातील काही खेडेगावांतील गणपती मंडळांच्या वतीने सात दिवसानंतर तर काही मंडळांच्या वतीने अनंत चतुर्दशीच्या दिवशी श्रींचे विसर्जन करण्यात येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.