यावल-पोलीस नायक (प्रतिनीधी) :-
दि.२६ सप्टेंबर २३ मंगळवार
तालुक्यातील उंटावद येथे नुकतीच नियुक्ती झालेले पोलीस पाटील यांचे स्वागत तर सेवानिवृत्त पोलिस पाटील यांना सन्मानपूर्वक निरोप समारंभ कार्यक्रम नुकताच संपन्न झाला.
तालुक्यातील उंटावद येथील पोलिस पाटील पद हे गेल्या काही दिवसापासून रिक्त असतांना नुकत्याच संपन्न झालेल्या पोलिस पाटील पदाच्या परिक्षेत हर्षल राजेंद्र पाटील हे सर्वाधीक गुणांनी उतीर्ण झाले होते.सदरहू फैजपुर विभागाचे प्रांत आधिकारी कैलास कडलक यांनी नुकतेच त्यांना नियुक्तपत्र पाठवत हर्षल पाटील यांची उंटावदच्या पोलिस पाटीलपदी नियुक्ती केली आहे.तद्नुसार हर्षल पाटील यांची पोलीस पाटील पदी निवड झाल्याबद्दल तसेच माजी पोलीस पाटील सुरेश माधवराव पाटील हे सेवानिवृत्त झाल्याबद्दल उंटावद येथे एका छोटेखानी कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले.यानिमित्ताने ग्रामपंचायत उपसरपंच भावना शशीकांत पाटील,विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन शशीकांत गुलाबराव पाटील,माजी उपसरपंच सुधाकर हिंम्मतराव पाटील,सेवानिवृत्त प्रा.विश्वनाथ एकनाथ पाटील,सामाजीक कार्यकर्ते विजय पाटील,वि.का.सोसा.चे संचालक जगदीश भाऊराव पाटील,मुरलीधर सुधाकर पाटील,शुक्राम गोकुळ कोळी,उंटावद परिसराचे पत्रकार महेश भागवत पाटील,भिकन बळवंत पाटील व पुष्कराज शशीकांत पाटील यांच्या वतीने नूतन पोलीस पाटील हर्षल पाटील यांचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचाली करिता शुभेच्छा देण्यात आल्या.सदरहू पोलिस पाटील पदी विराजमान झालेले हर्षल राजेंद्र पाटील उच्चशिक्षीत असुन ते माजी पोलीस पाटील सुरेश माधवराव पाटील यांचे पुतणे आहेत.