Just another WordPress site

ईद ए मिलाद निमित्ताने यावल येथील आठवडे बाजार शुक्रवार ऐवजी शनिवारी

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.२८ सप्टेंबर २३ गुरुवार

आज दि.२८ सप्टेंबर गुरुवार रोजी अनंत चतुर्दशी तालुक्यातील गणपती वित्सर्जन व उद्या दि.२९ सप्टेंबर शुक्रवार रोजी मुस्लीम बांधवांचा ईद-ए-मिलाद असे दोन सण मिळून येत असल्याने या पार्श्वभुमीवर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु याकरीता जळगाव जिल्ह्यात विविध ठिकाणी भरणारे आठवडे बाजार भरणार नसल्याचे प्रशासनाच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.

त्यानुसार उद्या दि.२९ सप्टेंबर शुक्रवार या दिवशी येणारे आठवडे बाजार सोयीचे दिवशी भरवावेत असे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आदेश पारित केला असल्याने यावल येथील उद्या शुक्रवारी भरणारा आठवडे बाजार हा दि.३० सप्टेंबर शनिवार रोजी भरविण्यात येणार असल्याचे तहसीलदार तथा दंडाधिकारी मोहनमाला नाझीरकर यांचे आदेशान्वये मुख्याधिकारी हेमंत निकम यांच्या वतीने दवंडी प्रसारित करण्यात आली आहे तसेच यावल येथे नियमित भरणारे शुक्रवारचे आठवडे बाजार हे ईद ए मिलादच्या मिरवणुकीमुळे शुक्रवार ऐवजी शनिवारी भरणार असल्याचे मुख्याधिकारी हेमंत निकम यांनी कळविले आहे त्यामुळे यावल तालुक्यातुन व पारिसरातुन तसेच विविध गावातुन आपले माल विक्रीस येणारे शेतकरी व जिवनावश्यक वस्तुची विक्रीसाठी येणारे व्यापारी यांनी याची नोंद घेऊन प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.तरी परिसरातील व्यापारी व शेतकरी यांनी यावल येथील शुक्रवारच्या दिवसी भाजीपाला व ईतर जिवनावश्यक वस्तुंच्या विक्रीसाठी येवु नये असे प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.