यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२८ सप्टेंबर २३ गुरुवार
येथील अच्युत धनाजी चौधरी माध्यमिक विद्यालयात काल दि.२७ सप्टेंबर बुधवार रोजी डोंगर कठोरा केंद्राची शिक्षण परिषद मोठ्या उत्साहात संपन्न झाली.सदरील शिक्षण परिषदेच्या अध्यक्षस्थानी अध्यक्ष बोरखेडे खु येथील ग्रेडेड मुख्याध्यापक राजेंद्र आत्माराम सोनवणे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके व माध्यमिक शिक्षक शिक्षक संघाचे तालुका अध्यक्ष जयंत चौधरी,तळेले सर होते तसेच मार्गदर्शक म्हणून केंद्रप्रमुख महंमद हबीब तडवी हे होते.
अगदी खेळीमेळीच्या वातावरणात शिक्षण परिषद मोठया उत्साहात पार पडली.यावेळी विविध योजना व अंमलबजावणी संदर्भात व शुरांची यशोगाथा या संदर्भात मोलाचे मार्गदर्शन गटशिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके यांनी केले.प्रसंगी केंद्रप्रमुख महंमद तडवी यांनी विविध शालेय कामकाजाविषयी उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शक सुचना केल्या.तसेच शिक्षण परीषदेत पहीली तासिका नवोपक्रम सहभाग व अहवाल लेखन याबाबत विजय बाऊस्कर यांनी मार्गदर्शन केले.दुसरी तासिका राज्यस्तरीय व्हीडीओ निर्मिती स्पर्धा शिक्षकांसाठी याविषयावर फकीरा तडवी व सौ.मोटे मॅडम यांनी मार्गदर्शन केले.तिसरी तासिका आयसीटीचा वापर कसा करावा या विषयी मार्गदर्शन विपीन वारके व हुसेन तडवी यांनी केले.चौथी तासिका यशोगाथा सादरीकरण याविषयावर श्रीमती कल्पना माळी राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षिका यांनी मार्गदर्शन केले.याप्रसंगी आदिवासी सेवा मंडळ पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त केंद्रप्रमुख महंमद हबीब तडवी व अतुल चौधरी जिल्हा आदर्श गुणवंत शिक्षक पुरस्कार तसेच श्रीमती कल्पना माळी राज्य पुरस्कार प्राप्त यांचा गट शिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके व अच्युत धनाजी चौधरी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक नितीन झांबरे तसेच डोंगर कठोरा केंद्रातील सर्व शिक्षक बंधु भगानिंच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षिय भाषणात राजेंद्र सोनवणे यांनी केंद्राच्या शिक्षण परिषद परिषदेचे कौतुक करून आयोजकांचे आभार मानले.कार्यक्रमाचे नियोजन व सुत्रसंचलन श्रीकांत मोटे अध्यक्ष अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ यावल यांनी केले तर आभार प्रदर्शन विजय बाऊस्कर यांनी केले.यावेळी डोंगर कठोरा केंद्रातील शिक्षक शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.