Just another WordPress site

चितोडा येथील युवकाची विहिरीत उडी मारून आत्महत्या

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.२९ सप्टेंबर २३ शुक्रवार

तालुक्यातील चितोडा येथील २३ वर्षीय तरूणास दोन महिलासह पाच जणांनी अज्ञात कारणावरून चापटा बुक्क्यांनी मारहाण करत व गावातून निघून जा अशी धमकी दिल्याने सदरील युवकाने घाबरून यावल शिवारातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची फिर्याद मयत युवकाचे वडील संतोष बाबुराव किनगे यांनी दिली आहे.त्यानुसार यावल पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून गावातील दोन महिलांसह पाच जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे कारणावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की,तालुक्यातील चितोडा येथील दुर्गेश संतोष किनगे वय २३ वर्ष या तरूणास अज्ञात कारणावरून गावातील दोन महिला सह भास्कर आनंदा जंगले,भूषण भास्कर जंगले,ज्ञानेश्वर भास्कर जंगले यांनी दि.२८ सप्टेंबर गुरुवार रोजी  सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान संतोष किनगे यास त्याच्या घरासमोर चापटा बुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ करीत तु गावातून निघून जा अशी धमकी दिल्याने दुर्गेश किनगे या युवकाने घाबरून यावल शिवारातील देविदास तुकाराम पाटील यांचे गट नंबर ५५७ चे शेतातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली.सदरहू  दि.२८ सप्टेंबर गुरुवार रोजी दुपारी चितोडा पोलीस पाटील पंकज वारके यांचे खबरी वरून यावल पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती तर सायंकाळी उशिरा मयताचे वडील संतोष किनगे यांनी दिलेल्या फिर्यादी वरून दोन महिलासह पाच संशयीताविरुद्ध तरुणास आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याच्या कारणावरून यावल पोलीस ठाण्यात भादवी कलम ३o६,३४ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस निरिक्षक राकेश माणगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक अविनाश दहिफळे हे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.