Just another WordPress site

स्व.हरीभाऊ जावळे यांच्या जयंतीनिमित्ताने ४ आक्टोबर रोजी शेतकऱ्यांसाठी शिबीराचे आयोजन

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.३० सप्टेंबर २३ शनिवार

माजी खासदार व आमदार कृषिमित्र स्वर्गवासी हरीभाऊ माधव जावळे यांच्या जयंतीनिमित्ताने दि.४ ऑक्टोबर बुधवार रोजी सकाळी ११ ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत कृषि उत्पन्न बाजार समिती यावल व तहसील कार्यालय यावल यांच्या संयुक्त विद्यमाने “शेतकरी बांधवांच्या समस्यांचे निराकरण” उपक्रमाद्वारे पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभांपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी शिबीराचे आयोजन करण्यात आले.

यावल रावेर लोकसभा व विधानसभा मतदार संघाचे माजी खासदार व आमदार कृषिमित्र स्वर्गवासी हरीभाऊ माधव जावळे यांच्या जयंती निमित्ताने दि.४ ऑक्टोबर बुधवार रोजी सकाळी ११ ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत येणाऱ्या‌ समस्यांचे निवारण कृषी उत्पन्न बाजार समिती व तहसील कार्यालय अंतर्गत महसूल अधिकाऱ्यांचे उपस्थितीत एकाच छताखाली शेतकरी बांधवांच्या समस्या निवारण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.दरम्यान ज्या शेतकरी बांधवांचे सदरील योजनेचे लाभ हप्ते थांबलेले असतील त्यांनी आधार कार्ड झेरॉक्स,७/१२ उताऱ्याची मूळ प्रत व पूर्वी ज्या बँक खात्यात पैसे जमा झालेले असतील त्या पासबुकाची झेरॉक्स तसेच इतर कागदपत्रांसह कृषि उत्पन्न बाजार समिती यावल येथे संपर्क साधावा असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती हर्षल गोविंदा पाटील,उपसभापती बबलु जर्नादन कोळी व सर्व संचालक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.