यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.३० सप्टेंबर २३ शनिवार
येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संस्थेचे कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनामार्फत दि.१७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२३ अंतर्गत आयुष्यमान भव सेवा पंधरवाडा निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्र.प्राचार्या डॉ.संध्या सोनवणे होत्या.कार्यक्रमासाठी जिल्हा रुग्णालय जळगाव येथील एम.डी. पॅथॉलॉजिस्ट व बीटीओ डॉ. शामली नावाडे,डॉ.ओमकार पवार,महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.ए.पी.पाटील व प्रा.संजय पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सर्व मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आला.
यावेळी महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्य डॉ.संध्या सोनवणे यांनी रक्तदान हे श्रेष्ठदान आहे.रक्तदान हे सामाजिक कर्तव्य आहे.आपण केलेल्या रक्तदानामुळे एखाद्या गरजू नागरिकाला जीवदान मिळू शकते व याची नोंद कुठेतरी होऊ शकते असे प्रतिपादन केले.यावेळी मनसेचे जळगाव जिल्ह्याचे पदाधिकारी चेतन आढळकर,पत्रकार शेखर पटेल,राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ.आर.डी.पवार, प्रा.मयूर सोनवणे, प्राध्यापक नंद किशोर बोदडे यांच्यासह १३ रक्तदात्यांनी रक्तदान केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा रुग्णालय जळगाव येथील टेक्निशियन लक्ष्मीकांत त्रिपाठी,कपिल पाटील,कल्पेश गावंडे,पीआरओ जितेंद्र पाटील,प्रभाकर पाटील,संदीप निळे तसेच महाविद्यालयाचे डॉ.एस.पी.कापडे,डॉ.पी.व्ही.पावरा,महिला कार्यक्रमाधिकारी सौ.प्रतिभा रावते, प्रा.नरेंद्र पाटील,प्रा.सि.टी.वसावे, प्रा.पी.व्ही. सपकाळे, प्रा.संजीव कदम, प्रा. मुकेश येवले,प्रा.मनोज पाटील,संतोष ठाकूर,प्रमोद कदम,प्रमोद जोहरे,प्रमोद भोईटे यांनी सहकार्य केले.