Just another WordPress site

आदिवासी कोळी महासंघाचा १० ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग सत्याग्रह

जिल्हा आदिवासी कोळी महासंघाच्या बैठकीत निर्णय;चोपड्यातुन हज्जारों कार्यकर्ते जाणार !!

डॉ सतीश भदाणे,पोलीस नायक

चोपडा तालुका (प्रतिनिधी) :-

७ ऑक्टोबर २३ शनिवार

जिल्ह्यातील आदिवासी कोळी लोकांना अनुसूचित जमातीचे दाखले मिळणेसाठी सर्वच प्रांत कार्यालयांकडे हजारो प्रकरणे प्रलंबित असून हे दाखले कोळी नोंदीनुसार सुलभ पद्धतीने मिळावेत व त्यांची वेळीच वैधता व्हावी यासह इतरही मागण्यांसाठी जिल्हा आदिवासी कोळी जमातीतर्फे तसेच चोपडा महर्षी वाल्मिकी समाज मंडळाचे तालुका संपर्कप्रमुख जगन्नाथ बाविस्कर (गोरगावले बु.) व आदिवासी कोळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष संजय कांडेलकर (मुक्ताईनगर) यांच्या मार्गदर्शनाखाली दि.१० ऑक्टोबर २३ मंगळवार रोजी सकाळी ११ वाजेपासुन मागण्या मान्य होईपर्यंत जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र अन्नत्याग सत्याग्रह आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.या आंदोलनामध्ये  जिल्हाभरातील सर्वपक्षीय कोळी समाजाचे नेतेमंडळी,सर्वच कोळी समाज संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते,आजीमाजी अधिकारी,कर्मचारी तसेच समाजबांधव हजारोंच्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

याआधी सदरील दाखले दिले जायचे मग आता का देत नाहित ? हा प्रश्नही ऐरणीवर आहे.घटनादत्त अधिकारानुसार महाराष्ट्र सरकारचे अनेक निर्णय व कोर्टाचे आदेश असतांनासुद्धा संबंधित विभागामार्फत कोळी लोकांना अनुसूचित जमातीच्या दाखल्यांपासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र सुरू आहे.प्रसंगी धरणे आंदोलन,जेलभरो आंदोलन,ठिय्या आंदोलन,रास्तारोको आंदोलन पर्यायाने आत्मदहनही करण्यात येईल व याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित विभागावर राहील.परिणामी कायदा शांतता सुव्यवस्था राखून हे काम करीत असतांना संबंधित विभागाने सहकार्य करावे असे जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.याबाबत चोपडा येथे समाजसेवक लखिचंद बाविस्कर यांचे निवासस्थानी बैठक घेण्यात आली.प्रसंगी प्रास्ताविक भाईदास कोळी यांनी केले.यावेळी कोळी समाजाचे नेते प्रभाकर सोनवणे यावल, जितेंद्र सपकाळे भुसावल,प्रल्हाद सोनवणे जळगाव यांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन पंकजकुमार रायसिंग यांनी केले तर आभार  भास्कर कोळी यांनी मानले.सदरील बैठकीस चोपडा तालुक्यातील कोळी समाजाचे पदाधिकारी,कार्यकर्ते व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.