घरकुल बांधकामाबाबत कुठलीही प्रक्रिया न करणाऱ्या लाभार्थ्यांना ‘ब ‘यादीतून काढून टाकावे
मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया यांचे आदेश
जळगाव -पोलीस नायक (जिल्हा प्रतिनिधी) :-प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत जिल्ह्यातील भूमिहीन लाभार्थ्यांना ग्रामपंचायत गावठाण तसेच शासनाच्या अधिग्रहित केलेल्या गावठाण जागा उपलब्ध असतांना देखील जे लाभारती उपलब्ध करून दिलेल्या जागेवर घरकुल बांधण्यास इच्छुक नसतील किंवा सदरील जागेवर राहण्यास जायला नकार देत असतील तसेच ज्या लाभार्थ्यांकडे स्वतः ची जागा उपलब्ध असूनही बांधकामाबाबत कुठलीही प्रक्रिया करीत नसतील अशा लाभार्थ्यांना ‘ब ‘यादीतून काढून टाकण्यात यावे असे आदेश मा.मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.पंकजा आशिया यांनी नुकतेच दिले आहे.आदेशात नमूद केले आहे कि,सरकारी व स्वतः च्या मालकीची जागा उपलब्ध असून देखील जे लाभार्थी घरकुल बांधकामाची कुठलीही प्रक्रिया पूर्ण करणार नाही अशा लाभार्थ्यांना ‘ब ‘यादीमधून वगळण्याची प्रक्रिया संबंधित यंत्रणांनी तात्काळ पूर्ण करावी.तसेच ज्या लाभार्थ्यांना घरकुल मंजूर होऊन प्राप्त झालेला असतांना देखील बांधकाम सुरु करणार नाही किंवा घरकुल अपूर्ण ठेवतील अशा लाभार्थ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे असे आदेशही मुख्यकार्यकारी अधिकारी पंकजा आशिया यांनी संबंधित यंत्रणांना दिला आहे.