Just another WordPress site

डोंगर कठोरा येथील खुशबू पाटील हिची जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेसाठी निवड

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.११ ऑक्टोबर २३ बुधवार

तालुक्यातील डोंगर कठोरा येथील वारकरी संप्रदायाचे भाविक भक्त रवींद्र मुरलीधर पाटील यांची मुलगी तसेच जे.टी.महाजन इंग्लिश मीडियम स्कुल फैजपूर येथील दहावीच्या इयत्तेत शिकत असलेली विद्यार्थिनी खुशबू रवींद्र पाटील हिने जिल्ह्याभरातुन विविध विद्यालयांअंतर्गत घेण्यात आलेल्या निबंध लेखन स्पर्धेत घवघवीत यश संपादन केल्यामुळे सदर विद्यार्थिनीची जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.सदरहू खुशबू पाटील यांच्या यशाबद्दल तिचे सर्व थरातून कौतुक केले जात आहे.

तालुक्यातील फैजपूर स्टडी सेंटरच्या वतीने जिल्हाभरात विविध विद्यालयांअंतर्गत नुकतीच निबंध स्पर्धा घेण्यात आली.सदरील स्पर्धेत जे.टी. महाजन इंग्लिश मीडियम स्कुलची विद्यार्थिनी व डोंगर कठोरा येथील नेहमी वारकरी संप्रदायाच्या सानिध्यात असलेले रवींद्र मुरलीधर पाटील यांची मुलगी खुशबु रवींद्र पाटील हिने या निबंध स्पर्धेत घवघवीत यश संपादन करून यशाच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला आहे.सदर स्पर्धेचा निकाल नुकताच घोषित करण्यात आला असून प्रथम क्रमांक दहावीची विद्यार्थिनी त्रिवेणी महाजन व तृतीय क्रमांक नववीची विद्यर्थिनी यज्ञ पाटील तर खुशबु पाटील हिने या स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवून यश संपादन केले आहे.परिणामी केंद्रातून द्वितीय क्रमांक मिळविल्याबद्दल खुशबु पाटील हि डिसेंबर महिन्यात होणाऱ्या जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे.सदरहू विद्यालयाचे प्राचार्य मोझेस जाधव यांच्या हस्ते यशस्वी विद्यर्थिनी त्रिवेणी महाजन,खुशबू पाटील व यज्ञ पाटील यांना रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे.यानिमित्ताने आयोजित एका छोटेखानी कार्यक्रमप्रसंगी प्राचार्य मोझेस जाधव,स्टडी सेंटरचे समन्वयक,पर्यवेक्षिका पूनम नेहेते, विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.प्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षिका दिपाली पाटील यांनी केले.जे.टी.महाजन इंग्लिश मीडियम स्कुलच्या यशाबद्दल शाळेचे व यशस्वी विद्यार्थ्यांनिंचे विविध स्तरातून अभिनंदन व कौतुक केले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.