यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१६ ऑक्टोबर २३ सोमवार
मराठा सेवा संघाच्या विभागीय कार्यकारणी निवडीची सभा नुकतीच जळगाव येथील निवृत्ती नगरातील मराठा सेवा संघाचे जिल्हा कार्यालयात नासीक विभागीय उपाध्यक्ष शिवश्री सुरेंद्र पाटील यांचे अध्यक्षतेखाली पार पडली.या बैठकीत विभाग निहाय कामाचा आढावा घेत जुनी कार्यकारणी बरखास्त करत नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली आहे.यात यावल,रावेर,मुक्ताईनगर,बोदवड या उपविभागासाठी कार्याध्यक्ष म्हणून यावल येथील डॉ.हेमंत जयवंतराव येवले तर सहसचिव म्हणून स्वयंदीप प्रतिष्ठानचे संचालक संदीप निंबाजी सोनवणे पाटील तर उपाध्यक्ष म्हणून दहिगाव येथील बी.डी.पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
बैठकीच्या सुरुवातीस मा जिजाऊंच्या प्रतिमेस विभागीय उपाध्यक्ष सुरेंद्र पाटील,जिल्हा कार्यकारणीचे सुरेश लक्ष्मण पाटील,राम पवार, चन्द्रशेखर भदाणे,जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष लीना पवार यांच्या वतीने जिजाऊंच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करत जिजाऊ वंदन करण्यात आले.याप्रसंगी विभागीय उपाध्यक्ष सुरेंद्र पाटील यांनी तालुका समितीकडून आढावा घेतला तर जिल्हा कार्यकारिणीचे सुरेश लक्ष्मण पाटील यांनी प्रास्ताविक केले.याप्रसंगी सेवा संघाचे कामास गती मिळावी यासाठी जळगाव जिल्ह्याचे तालुक्याचे पाच विभाग करण्यात आले यात एक यावल, रावेर,मुक्ताईनगर बोदवड दोन जळगाव,भुसावळ व जामनेर तीन चाळीसगाव,भडगाव,पाचोरा,पारोळा चार एरंडोल,धरणगाव,अमळनेर, चोपडा पाच जळगाव महानगर असे पाच विभाग करण्यात आले.यात यावल,रावेर,मुक्ताईनगर व बोदवड या विभागासाठी तालुक्यातून कार्याध्यक्ष म्हणून डॉ.हेमंत येवले,सहसचिव म्हणून स्वयमदीप प्रतिष्ठानचे संचालक संदीप निंबाजी सोनवणे,उपाध्यक्ष बी.डी.पाटील यांची निवड करण्यात आली आहे.सदर बैठकीस जिल्ह्यातील सर्व तालुका कार्यकारिणी पदाधिकारी सदस्यासह यावल येथून तालुकाध्यक्ष अजय पाटील, डी.बी.पाटील,संभाजी ब्रिगेडचे विजय रमेश पाटील,सुनील दशरथ गावडे पाटील,संभाजी ब्रिगेडचे अनिल पाटील उपस्थित होते.निवडीबद्दल राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रा.मुकेश येवले,यावल नगर परिषदचे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील,वसंत गजमल पाटील,देविदास नाना पाटील, जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण समिती सभापती रवींद्र उर्फ छोटू पाटील,सुरेश आबा पाटील,पंचायत समितीचे माजी उपसभापती उमाकांत पाटील,चिंचोली विद्यालयाचे चेअरमन अनिल दंगल साठे,किनगाव येथील मनीष विजय कुमार,देवकांत पाटील,महेंद्र पाटील आदींनी अभिनंदन केले आहे.