यावल- पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१६ ऑक्टोबर २३ सोमवार
धनगर समाजाला आदिवासी (एसटी) अनुसुचित जमातीचे आरक्षण न देणे व जळगाव जिल्ह्यातील बोगस आदिवासींचे एसटी अनुसुचित जमातीचे दिलेले दाखले रद्द करण्यात यावे अशा विविध मागण्यासाठी आदिवासी तडवी भिल्ल एकता मंचच्या वतीने दि.१८ ऑक्टोबर बुधवार रोजी फैजपुर येथील प्रांत अधिकारी कार्यावर भव्य आदिवासी जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार असुन आपल्या न्याय हक्काच्या संघर्षासाठी या मोर्चात चोपडा,रावेर व यावलसह जिल्ह्यातील आदिवासी बांधवांनी मोठया संख्येने मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन आदिवासी तडवी भिल्ल एकता मंचचे संस्थापक अध्यक्ष एम.बी.तडवी यांनी केले आहे.
आदिवासी तडवी भिल्ल एकता मंच महाराष्ट्रच्या वतीने काढण्यात आलेल्या आवाहन पत्रकात संघटनेने आपल्या प्रमुख मागण्यांमध्ये म्हटले आहे की,धनगर समाजाला एसटीचे आरक्षण देण्यात येवु नये,जळगाव जिल्ह्यातील बोगस आदिवासी एसटी जातीचे दिलेले दाखले रद्द करण्यात यावे,रावेर,यावल व चोपडा तालुक्यातील कायम रहिवास करीत असलेल्यासाठी आदिवासींचे ग्रामपंचायत दप्तरी नमुना क्रमांक ८ ला नांवे दाखल करण्यात यावी,पेसा कायदा अधिक सक्त करण्यात यावा,फैजपुर येथे एक हजार विद्यार्थी व विद्यार्थीनीसाठी आदिवासी वस्तीगृह सुरू करण्यात यावे,याशिवाय तिडया,अंधारमंळी व मोहमांडली या अतिदुर्गम क्षेत्रात रस्ते तयार करण्यात यावेत अशा विविध ज्वलंत प्रश्नांना घेवुन आदिवासी तडवी भिल्ल एक्तता मंचच्या वतीने दि.१८ ऑक्टोबर बुधवार रोजी सकाळी ९ वाजेपासुन फैजपुर साखर कारखाना ते फैजपुर प्रांत आधिकारी कार्यालयापर्यंत पायी मोर्चा काढण्यात येणार असुन या मोर्चात आदिवासी बांधवांनी हजारोंच्या संख्येत उपस्थित राहावे असे आवाहन संघटनेचे राज्य अध्यक्ष एम.बी.तडवी व सर्व पदाधिकारी यांनी केले आहे.