यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२० ऑक्टोबर २३
येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज मित्रमंडळाच्या वतीने परंपरागत साजरे करण्यात येणारे रावण दहन कार्यक्रमाचे आयोजन महर्षी व्यास मंदिराच्या पटांगणावर दि.२४ ऑक्टोबर मंगळवार रोजी विविध मान्यवरांच्या उपस्थित करण्यात येणार आहे.
दरम्यान दि.२४ ऑक्टोबर मंगळवार रोजी सायंकाळी होणाऱ्या या रावण दहन कार्यक्रमासाठी रावेर यावल विधानसभा क्षेत्राचे आ.शिरीष चौधरी यांच्या हस्ते होणार असुन या कार्यक्रमास माजी महसूलमंत्री तथा आ.एकनाथराव खडसे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमोल हरिभाऊ जावळे,प्रसिद्ध श्रीराम उद्योग समूहाचे अध्यक्ष श्रीराम पाटील,प्रहार संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी, यावलचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष शशांक प्रभाकर देशपांडे,आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष व माजी नगरसेवक डॉ.कुंदन फेगडे,काँग्रेस अध्यक्ष प्रभाकर आप्पा सोनवणे,यावलचे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील,दीपक बेहडे,हाजी मुस्तफा खा सुब्हान खा,शिवसेना (उबाठाचे) तालुका उपाध्यक्ष शरद कोळी,तुषार उर्फ मुन्ना पाटील,पंचायत समितीचे गटनेते शेखर पाटील,कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती हर्षल पाटील या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत रावण दहन कार्यक्रम संपन्न होणार आहे.मागील २५ वर्षापासून संपन्न होत असलेल्या या रावण दहनाच्या कार्यक्रमास संपूर्ण तालुक्यातील नागरिक आतिषबाजी पाहण्यासाठी येत असतात.यावल येथील महर्षी व्यास मंदिराच्या पटांगणामध्ये हा कार्यक्रम आनंदात व उत्साहात संपन्न होतो.तरी तालुक्यातील नागरिकांनी उपस्थित राहून या रावण दहन कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक समिती अध्यक्ष प्रा.मुकेश येवले,अमोल दुसाने,अमोल भिरूड,उमेश फेगडे,डॉ.हेमंत येवले,विवेक देवरे,अरुण लोखंडे, संतोष कवडीवाले,योगेश लावणे,कामराज घारू,चेतन आढळकर,अभिमन्यू चौधरी,शरद कोळी तसेच समिती सदस्यांनी केले आहे.