बुऱ्हाणपुर अंकलेश्वर राज्य महामार्गाच्या खडयांच्या दुरुस्तीचे काम निकृष्ट प्रतिचे
माजी जिल्हा परिषद शिक्षण सभापती रवींद्र पाटील यांनी विचारला ठेकेदारास जाब
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२२ ऑक्टोबर २३ रविवार
महाराष्ट्र,मध्यप्रदेश व गुजरात या तीन राज्यांना जोडणारा ब-हाणपुर-अंकलेश्वर या राज्य महामार्गावर पडलेल्या खड्यांमुळे वारंवार अपघातां मध्ये मोठी वाढ झालेली असल्याने वाहनधारकांची वाहने व हाडे खिळखिळी झाली असुन वाहनधारंना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.अशात नुकतेच सार्वजनिक बांधकाम विभागाने दिलेल्या ठेकेदाराच्या माध्यमातून या महामार्गाचे दुरुस्तीचे काम हे फारच नित्कृष्ट प्रतीचे केले जात असल्याने याबाबत माजी जिल्हा परिषदचे शिक्षण सभापती रवींद्र पाटील यांनी संबंधित ठेकेदारास धारेवर धरत सदरील काम चांगल्या प्रतीचे करण्याबाबत सज्जड दमच दिला आहे.
सदरील महामार्गाची फारच वाताहत झालेली असून वाहन धारकांना अनेक महिन्यांपासून नाहक त्रास सहन करावा लागत असून या राज्य महामार्गावर वाहनधारकांना कुठलेच वाहन व्यवस्थितपणे चालवता येत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.सदर रस्त्यावर ठिकठिकाणी फूटभर खड्डे पडलेले असुन यामुळे वाहन चालवावे तरी कसे? असा प्रश्न प्रत्येक वाहन धारकांना पडत आहे परिणामी संपूर्ण महामार्गाचे उच्चप्रतिचे डांबरीकरण व्हावे अशी मागणी वारंवार करण्यात येत आहे.गुजरात-महाराष्ट्र-मध्यप्रदेश या तीन राज्यांना जोडणारा ब-हाणपुर- अंकलेश्वर हा एकमेव राज्यमहामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे दयनिय अवस्था झाली असुन यावल रोडवरील गॅस एजन्सी पासुन रस्ता दुरुस्तीचे काम सुरु करण्यात आले आहे.सदरील काम करीत असतांना खड्डे बुजवणारे खो-खोचा गेम खेळत आहेत यात १० खड्डे बुजले तर २० खड्डे सोडले जात आहे व या खड्ड्यांमधील आधीची माती बाहेर न काढता बारीक खडी टाकून व डांबरसुद्धा कमी प्रमाणात वापरले जात आहे.याबाबत माजी जिल्हा परिषद शिक्षण सभापती रवींद्र पाटील यांनी नित्कृष्ट प्रतीच्या करण्यात येत असलेल्या कामाबद्दल ठेकेदारास जाब विचारून “चांगले काम करा” असा सज्जड इशारा दिला नाही तर आम्ही याच्यासाठी आंदोलन करू असा इशाराही दिला आहे.