यावल-पोलीस नायक (प्रतिनीधी) :-
दि.२३ ऑक्टोबर २३ सोमवार
तालुक्यातील किनगाव येथील इंग्लिश मिडीयम निवासी स्कुलच्या आदिवासी विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय स्पर्धेत नेत्रदिपक यश मिळविल्याने सदरील खेळाडूंची राज्यस्तरीय वुशू स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.यात विभागीय वुशू स्पर्धा जिल्हा पातळीवरील क्रिडा स्पर्धत रोशन बारेला याने प्रथम क्रमांक तर निलम बारेला हिने द्वितीय क्रमांक पटकाविला आहे.
धुळे येथील संकुलात नुकत्याच संम्पन्न झालेल्या राज्यस्तरीय वुशु स्पर्धेत ४८ किलो वजनगटात तालुक्यातील किनगाव येथील इग्लिश मिडीयम निवासी पब्लिक स्कूल किनगावच्या रोशन रमेश बारेला प्रथम तर निलम रेबा बारेला व शिवम कैलास बारेला यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. यात प्रथम क्रमांकाने विजयी झालेल्या रोशन रमेश बारेला याची राज्यस्तरीय वुशू स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.या सर्व खेळाडूंना प्रशिक्षक तुषार जाधव व क्रिडा शिक्षक तसेच यावल तालुका क्रिडा समन्वयक दिलीप बिहारी संगेले यांचे मार्गदर्शन लाभले.सदरील सर्व विजयी खेळाडूंचे स्कुलचे चेअरमन विजयकुमार देवचंद पाटील,व्हाइस चेअरमन शैलेजाताई विजयकुमार पाटील,सचिव मनिष विजकुमार पाटील, व्यवस्थापक पुनम मनिष पाटील,प्राचार्य अशोक प्रतापसिंग पाटील,उप प्राचार्य राजश्री सुभाष अहिरराव तसेच इतर सहकारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे स्वागत करून अभिनंदन करत रोशन रमेश बारेला यास राज्यस्तरीय स्पर्धेसाठीच्या भावी चाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.