यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२६ ऑक्टोबर २३ गुरुवार
तालुक्यातील दहा ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक आणि नऊ ग्रामपंचायतच्या पोट निवडणूकीत काल दि.२५ ऑक्टोबर बुधवार या माघारीच्या अंतिम दिवशी गिरडगाव ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंचसह संपूर्ण सदस्य हे बिनविरोध विजयी झाले आहे तर गाड्ऱ्या ग्रामपंचायतचे सर्व नऊ सदस्य बिनविरोध विजयी झाले आहेत.
दरम्यान माघारीनंतर तालुक्यातील लोकनियुक्त सरपंचांसह एकुण २३ सदस्य बिनविरोध ठरले आहे तर लोकनियुक्त सरपंचच्या एकुण १० जागासाठी एकुण ३६ उमेदवार तर सदस्यांच्या एकुण ७७ जागांकरीता १९४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहे.कालच माघारीनंतर चिन्ह वाटप करण्यात आले असुन ग्रामिण भागात प्रचाराची रणधुमाळीला सुरूवात करण्यात आली आहे.काल बुधवार रोजी माघारीकरिता तहसील कार्यालयामध्ये उमेदवारांची व बघ्यांची प्रचंड गर्दी झाली होती.यावेळी सदस्यपदा करीता ५६ तर सरपंच पदावरील १८ उमेदवारांनी माघार घेतली आहे.दरम्यान तालुक्यात १० ग्रामपंचायतीमध्ये सार्वत्रीक तर ९ ग्रामपंचायतीत पोटनिवडणुक होत आहे यात बुधवारी माघारीच्या दिवशी लोक नियुक्त सरपंच पदावरील १८ तर सदस्य पदाकरीता ५६ उमेदवारांनी माघार घेतली आहे.परिणामी गिरडगाव ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंचसह संपुर्ण सदस्य तर गाड्ऱ्या ग्रामपंचायतीचे सर्व ९ सदस्य तसेच म्हैसवाडी,किनगाव खुर्द,सावखेडा सिम,शिरागड या गावातुन एकुण २३ सदस्य बिनविरोध ठरले आहे.आता एकुण १० लोकनियुक्त सरपंच पदाकरीता ३६ उमेदवार रिंगणात असुन सदस्यांच्या एकुण ७७ जागेकरीता १९४ उमेदवार रिंगणात आहे.बुधवारी माघारीच्या वेळेपर्यंत तहसिल कार्यालयात प्रचंड गर्दी झाली होती.संपुर्ण प्रक्रीया तहसीलदार मोहनमाला नाझीरकर,निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक निर्णय अधिकारी जी.टी. सोनवणे,सचिन जगताप,ए.वाय.बडगुजर,एम.पी.देवरे,एम.एच.तडवी,मीना तडवी,बबीता चौधरी,एस.एल.पाटील, एच.एन.तडवी,व्ही.डी.पाटील, एन.पी.वैराळकर,ए.एस.खैरनार,एस.आर.शेकोकार,के.पी.वायसे,सुयोग पाटील यांनी राबवली.माघारी नंतर निवडणुक लढवणाऱ्या उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आले परिणामी ग्रामिण भागात आज दि.२६ ऑक्टोबर गुरूवारपासुन प्रचाराला सुरवात होत असून राजकीय वातावरण तापायला सुरुवात होणार आहे.
यात गिरडगावची बिनविरोध परंपरा कायम ठेवत गेल्या दोन पंचवार्षीक ग्रामपंचायतीत बिनविरोध निवडणूकीचा पायंडा यंदा देखील कायम राहिला असून येथे लोकनियुक्त सरपंच म्हणुन आशा हुसेन तडवी तर सदस्य म्हणुन रेहाना तडवी,किशोर पाटील,आशाबाई पाटील,शकीला तडवी,मोहीनी पाटील व प्रभाकर पाटील बिनविरोध निवडून आले आहेत.दरम्यान गाड्ऱ्या येथे केवळ लोकनियुक्त सरपंच पदाकरीता निवडणुक होणार असून तालुक्यातील सातपुड्याच्या कुशीत अतिदुर्गम भागात वसलेल्या आदिवासी गाड्ऱ्या ग्रामपंचायतीचे काशिराम बारेला,शेवंती बारेला,सुलोचना बारेला,बिलवारसिंग बारेला,फुलसिंग बारेला,मीराबाई बारेला,शांताराम बारेला,लक्ष्मी बारेला,रमाबाई बारेला हे सदस्य बिनविरोध ठरले तर लोकनियुक्त सरपंचपदाकरीता पाच उमेदवार रिंगणात आहे तसेच किनगाव खुर्दमध्ये तिरंगी लढत होणार असून यात बाजार समितीचे उपसभापती दगडू कोळी यांच्या पत्नी रूपाली दगडू कोळी सह हसिना गफुर तडवी व समीना शब्बीर तडवी यांच्यात तिरंगी लढत रंगणार आहे.
सदरहू म्हैसवाडी येथून काजल बाविस्कर,तुकाराम चौधरी,सपना चौधरी,मिना चौधरी हे चौघे तर किनगाव खुर्द येथून स्वाती भुषण पाटील सावखेडासिम येथील मुस्तुफा तडवी,शिरागड येथील रेखाबाई कोळी व बोराळे येथील दिपाली चौधरी हे बिनविरोध ठरले आहेत.दरम्यान साकळी ग्रामपंचायत निवडणूकित सदस्य पदासाठी ४२ तर सरपंच पदासाठी ४ उमेदवार रिंगणात असून तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष असलेल्या साकळी ग्रामपंचायत निवडणुकीत सदस्य पदासाठी ६१ अर्ज होते माघारनंतर अंतिम ४२ ग्रामपंचायत सदस्य निवडणूक रिंगणात असुन १९ अर्ज माघार घेण्यात आले तर लोकनियुक्त सरपंचपदासाठी एकुण सहा अर्ज होते त्यापैकी चार अर्ज रिंगणात आहेत.यात जि.प.चे माजी आरोग्य सभापती रविंद्र सूर्यभान पाटील यांनी साकळी ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच पदासाठी अर्ज दाखल केला होता परंतु त्यांनी अर्ज माघार घेतला आहे त्यांचबरोबर साहेबराब मोतीराम बडगुजर यांनी सुद्धा लोकनियुक्त सरपंचपदाचा अर्ज माघारी घेतला आहे त्यामुळे साकळी ग्रामपंचायत लोकनियुक्ती सरपंच पदासाठी दिपक नागो पाटील,किरण मधुकर महाजन,सय्यद तय्यब सय्यद ताहेर,मनोज सुकलाल तेली असे चार अर्ज निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्यामुळे येथे चौरंगी लढतीचे चित्र निर्माण झाले आहे.