यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१ नोव्हेंबर २३ बुधवार
महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन डीएनए १३६ यावल तालुका शाखेची नुतन पंचवार्षीक कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली असुन तालुका अध्यक्षपदी राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श ग्रामसेवक मजीत अरमान तडवी यांची तर तालुका सचिव पदावर लक्ष्मीकांत महाजन व तालुका उपाध्यक्षपदी रविन्द्र टी बाविस्कर व महिला उपाध्यक्षपदी श्रीमती कविता बाविस्कर यांची निवड करण्यात आली आहे.
यावल पंचायत समिती कार्यालयाच्या नुतन ईमारतीच्या सभागृहात महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन डीएनए १३६ तालुका शाखेची सर्वसाधारण बैठक ग्रामसेवक संघटनेचे जळगाव जिल्हा सचिव संजय भारंबे यांच्या अध्यक्षतेखाली तर संघटनेचे सहाय्यक निरिक्षक म्हणुन जिल्हा सरचिटणीस दिपक तायडे यांच्या प्रमुख उपस्थितीत नुतन तालुका पंचवार्षीक कार्यकारणीची निवड अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.यावेळी संघटनेच्या तालुका अध्यक्षपदी आदर्श ग्रामसेवक मजीत अरमान तडवी,उपाध्यक्षपदी रविन्द्र टी बाविस्कर,महिला उपाध्यक्ष श्रीमती कविता बाविस्कर,सचिवपदी लक्ष्मीकांत महाजन,कोषाध्यक्षपदी आनंद सुरवाडे,सहसचिव प्रदीप धनगर,प्रसिद्धी प्रमुखपदी प्रविण कोळी,संघटक विजय साळुंके,महिला संघटक श्रीमती सुषमा कोळी,मानद अध्यक्ष शिवाजी सोनवणे,कार्याध्यक्षपदी डी.डी.पाटील,मानद सचिव राजु तडवी,कायदेविषयक सल्लागार बाळु वायकोळे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.बैठकीचे सुत्रसंचालन पी.व्ही.तळेले यांनी केले तर उपस्थितांचे आभार जिल्हा मानद सचिव गौतम वाडे यांनी मानले.या बैठकीस मावळते तालुका अध्यक्ष तथा सेवानिवृत्त ग्रामसेवक रूबाब तडवी यांच्यासह संघटनेचे जिल्हा सरचिटणीस संजय भारंबे,जिल्हा उपाध्यक्ष दिपक तायडे यांच्यासह आदी मान्यवरांकडून नुतन कार्यकारणी सदस्यांचे स्वागत करण्यात आले.