Just another WordPress site

सातोद शिवारातील नवजात बाळाच्या मृत्युस कारणीभुत अज्ञात महीले विरुद्ध गुन्हा दाखल

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.८ नोव्हेंबर २३ बुधवार

तालुक्यातील सातोद शिवारात काल दि.७ नोव्हेंबर मंगळवार रोजी अर्धवट कुजलेल्या मृत अवस्थेत सापड़ेल्या नवजात अर्भकच्या मृत्युस कारणीभुत असल्याप्रकरणी अज्ञात महिलेच्या विरूद्ध यावल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर बाळाच्या वारसाचा शोध घेण्याकामी सदर बाळाचा मृतदेह जळगाव येथे शासकीय वैद्यकीय विद्यालयात डीएनए चाचणी व शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला  आहे.

याबाबत पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की,तालुक्यातील सातोद येथील इंदीरानगर वस्तीजवळ असलेल्या नाल्याजवळच्या उकीरड्यावर दि.७ नोव्हेंबर मंगळवार रोजी या परिसरात एखादा प्राणी मरण पावला असावा या प्रकारामुळे दुर्गंधी पसरल्याने नागरिकांना त्रास होत असल्याने याबाबतची माहिती राहणाऱ्या ग्रामस्थांनी सातोद ग्रामपंचायतकडे केली असता त्या परिसरात सफाई कर्मचारी गेला असता त्यास अंदाजे एक ते दोन दिवसापुर्वीच अनैतिक संबधातुन जन्मास आलेले नवजात बाळ मिळुन आले.कुणीतरी अज्ञात महिलेने समाजात आपली बदनामी होईल या भितीपोटी परित्याग करून त्याच्या जन्माची हकीगत लपविण्यासाठी त्या ठीकाणी फेकुन दिल्याने बाळाचा मृतदेह हा अर्धशरीर हे प्राण्यांनी खाल्याचे परिस्थितीत मिळून आले.सदरील प्रकार उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे असून या संदर्भात यावल पोलीस ठाण्यात सातोद गावाचे पोलीस पाटील चंदन अशोक पाटील यांनी फिर्याद दिल्याने अज्ञात महिलेच्या विरुद्ध भादवी ३१८ कलमन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे व पोलीस हेड कॉन्सटेबल राजेन्द्र पवार हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.