Just another WordPress site

मनवेल येथील गर्भवती महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.८ नोव्हेंबर २३ बुधवार

तालुक्यातील मनवेल येथे राहणाऱ्या एका गर्भवती महीलेने लग्नाच्या चार वर्षानंतर प्रथम बाळास जन्म देण्याआधीच गळफास घेऊन आपली जिवनयात्रा संपविल्याने गावात एकच शोककळा पसरली असून याबाबत यावल पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की,तालुक्यातील मनवेल येथे राहणारी शितल उर्फ रूपाली विजय कोळी वय २२ वर्ष या महिलेने दि.७नोव्हेंबर मंगळवार रोजी चार महीन्याच्या गर्भवती अवस्थेत असलेल्या विवाहित महिलेने घरातील मंडळी घराबाहेर बसलेली असतांना आपल्या राहत्या घरातील छताच्या लोखंडी एंगलच्या सहाय्याने साडी बांधुन गळफास घेत आत्महत्या केली आहे.सदर आत्महत्या केलेल्या महिलेचा पती विजय कोळी हे घरात गेल्यावर हा प्रकार दिसुन आला.यावेळी त्यांने आरडाओरड केल्यावर घरातील व परिसरातील मंडळी घराकडे धाव घेत तिला जिवंत असेल या आशेने त्याच अवस्थेत खाली उतरविले असता ती मयत झाल्याचे दिसुन आले.या गर्भवती महिलेचे मृतदेह यावलच्या ग्रामीण रुग्णालयात आणले असता ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रशांत जावळे यांनी मृतदेहाचे शवविच्छेदन केले.या घटनेची खबर मयताचे सासरे भगवान दौलत कोळी वय ५७ वर्ष यांनी यावल पोलीस ठाण्यात दिल्याने अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असुन पुढील तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक सुनिल मोरे व पोलिस करीत आहे.गर्भवती महिलेने अशा प्रकारे टोकाचे पाऊल का उचलले हे मात्र स्पष्ट होवु शकले नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.