गिरीश महाजन यांनी माझ्या आजारावर प्रतिक्रिया दिली असून मला वाटते त्यांचे वय साठ वर्षांचे होत आले आहे.’साठी आणि बुद्धी नाठी असे होत असल्यामुळे त्यांना काही सुचत नाही असे दिसत आहे.वैद्यकीय शिक्षण मंत्री असतांना त्यांनी स्त्रीरोगांकडे जास्त लक्ष दिले त्यामुळे त्यांचे हृदयरोगांकडे कमी लक्ष गेले.त्यांना जर खात्री करायची असेल तर माझी कागदपत्रे तपासावीत त्यात कार्डिअॅटिक अरेस्ट काय असेल तो देखील पाहून घ्यावा.माझे हृदय बंद पडले होते व बंद पडलेले हृदय सुरु करण्यासाठी अथक परिश्रम डॉक्टरांना करावे लागले.यात ७० ते ८० लाख लोकांमधून एखादा अशा अवस्थेतून परत येतो तसा मी परत आलो आहे कारण संत मुक्ताबाईंचे आणि अनेकांचे आशीर्वाद माझ्या पाठिशी होते परंतु आता गिरीश महाजन यांना हे कसे कळणार? असा सवाल खडसे यांनी या व्हिडीओत केला आहे.
एकनाथ खडसे यांनी पुढे म्हटले आहे की,मेडिकल एज्युकेशन डिपार्टमेंटला गिरीश महाजन यांनी जे चाळे केले त्यामुळे त्यांची हकालपट्टी झाली.आता माझे गिरीश महाजन यांना आव्हान आहे की,माझ्या सगळ्या कागदपत्रांची खात्री करावी.माझा आजार खरा आहे की खोटा आहे हे त्यांनी तपासून घ्यावे जर त्यांना हे सांगता आले की माझा आजार खोटा आहे व सहानुभूती मिळावी म्हणून मी हे केले आहे तर गिरीश महाजन यांनी भर चौकात मला जोडे मारावेत परंतु माझी कागदपत्रे खरी आहेत हे सिद्ध झाले तर मी गिरीश महाजन यांना भर चौकात जोडे मारायला तयार आहे.मला वाटते गिरीश महाजन माझे आव्हान स्वीकारतील आणि जोडे खायला तयार होतील.जर चुकीचे असेल तर मी जोडे खायला तयार आहे असे म्हणत त्यांनी गिरीश महाजन यांना खुले आव्हान दिले आहे.
त्याचबरोबर गिरीश महाजन यांना माझ्या नावाची कावीळ झाली असून गिरीश महाजन यांनी खरेतर कापसावर बोलले पाहिजे.कापूस उत्पादक, केळी उत्पादक अडचणीत आहेत.मागच्या वेळी शहाणपणा केला आणि मनोज जरांगे पाटील यांना भेटायला गेले,सरकारचे संकटमोचक झाले. आता जरा पुन्हा जरांगे पाटील यांची भेट घेऊन पाहा.संकट मोचक म्हणवून घ्यायचे आणि पळ काढायचा व शेपूट घालायचे असे गिरीश महाजन करत असल्याची टीकाही एकनाथ खडसे यांनी केली आहे.