Just another WordPress site

डोंगर कठोरा येथे पुणे येथील ज्ञान प्रबोधनी विद्यार्थ्यांचे मातृभूमी परिचय शिबिराचे आयोजन

ग्रामीण भागातील कृषी तसेच नावीन्यपूर्ण बाबींचा अभ्यास करणार

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.२५ नोव्हेंबर २३ शनिवार

तालुक्यातील डोंगर कठोरा येथील अच्युत धनाजी चौधरी विद्यालय व ज्युनिअर कॉलेज मध्ये पुणे निगडी येथील ज्ञान प्रबोधिनी गुरुकुल या १२ तास चालणाऱ्या शाळेतील इयत्ता ७ वी व ८ वीच्या ४५ विद्यार्थी व ३ शिक्षक यांच्या माध्यमातून दि.१९ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर या कालावधीत मातृभूमी परिचय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिराच्या निमित्ताने सदरील विद्यार्थी स्थानिक संस्कृती,परंपरा,खाद्य संस्कृती,शेतीची वैशिष्ट्ये,सातपुडा पर्वत रांगेची ओळख करुन घेत आहेत.सदरहू गावातील ग्रामस्थांच्या उपस्थितीत भगवद्गीतेच्या १५ व्या अध्याय पठणाने व शारीरिक कसरतींचे प्रात्यक्षिक करून शिबिराचे उद्घाटन करणात आले.दरम्यान शिबिरार्थी विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यास दौऱ्यात कापसाची लागवड कशी केली जाते?याबाबत कापसाची प्रत्यक्ष शेतात वेचणी करुन समजून घेतले त्याचबरोबर केळीची लागवड कशी केली जाते?त्याचा व्यापार कसा होतो?केळी बागेची आधुनिक व पारंपरिक लागवड पद्धत याची माहिती विद्यार्थ्यांनी घेतली.सातपुडा पर्वत रांगेचे पौराणिक महत्त्व श्री क्षेत्र डोंगरदे येथील भेटीत विद्यार्थ्यांनी मठाच्या स्वरूपानंद महाराजांकडून समजून घेतले तसेच डोंगरदे येथील आदिवासी समाजाच्या वस्तीवर विद्यार्थ्यांनी रहीवाश्यांशी संवाद साधत प्रत्येक घरात मुलांनी पुण्याहून आणलेला खाऊ भेट म्हणून दिला त्याचबरोबर आदिवासी तालावर विद्यार्थ्यांनी त्यांचे पारंपरिक बर्ची नृत्य सादर केले.दरम्यान श्री क्षेत्र मनुदेवी संस्थान आडगाव येथेही भेट देऊन शिबिरार्थींच्या वतीने श्री.मनुदेवींचे आशीर्वाद घेण्यात आले.

अभ्यास दौऱ्यात विद्यार्थ्यांनी गावाजवळील अरिहंत जिनिंग व प्रेसिंग मिलमध्ये भेट देऊन कापसापासून कापूस पिंजून अलग करणे,कापसातील सरकी वेगळी करणे व तपासून कापसाचा गाठी तयार करणे याबाबतची माहिती समजून घेतली तसेच मिलके चलो असोसिएशन अमळनेर तर्फे अनिरुद्ध पाटील व सिद्धार्थ पाटील यांनी विद्यार्थ्यांना विज्ञानाच्या विविध संकल्पना प्रात्यक्षिकातुन समजावून सांगितल्या यामध्येही विद्यार्थ्यांनी हिरीरीने सहभाग नोंदविला.यासोबत विद्यार्थी गावामध्ये रोज सकाळी प्रभात फेरी काढत असून संध्याकाळच्या भजनात नियमित सहभागी होत आहेत.या शिबिराच्या पूर्ण आयोजनात मूळ डोंगर कठोरा येथील रहिवाशी व सध्या पुण्याला स्थायिक डॉ.पराग पाटील,अमोल जावळे,डॉ.राजेंद्रकुमार झांबरे,सरपंच नवाज तडवी,मुख्याध्यापक नितीन झांबरे,उपसरपंच योगेश पाटील,पी.डी.भिरुड,माजी सरपंच मनोहर महाजन,सचिन एम.राणे,रुपेश पाटील,सागर झोपे,चंद्रकांत भिरुड,केवल राणे,धनंजय पाटील व ग्रामस्थांचे सहकार्य लाभत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.