Just another WordPress site

“३ डिसेंबरनंतर देशात कुठल्या ना कुठल्या भागात नरसंहार घडेल”-प्रकाश आंबेडकरांचे सूचक विधान

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२७ नोव्हेंबर २३ सोमवार

सध्या देशात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठी मतदान घेतले जात असून या सर्व राज्यांच्या निवडणुकीचा निकाल ३ डिसेंबर रोजी लागणार आहे.या निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मोठे विधान केले असून ३ डिसेंबर नंतर देशात कुठल्या ना कुठल्या भागात नरसंहार घडेल अशी शक्यता प्रकाश आंबेडकर यांनी संविधान सन्मान महासभेत बोलतांना वर्तवली आहे.

या सभेतून प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा थेट उल्लेख न करता जोरदार टीका केली असून सध्या देशात आरक्षणाच्या नावाने समाजा-समाजाला एकमेकांच्या विरोधात लढवले जाते आहे अशी परिस्थिती आहे.हे थांबवण्याऐवजी खतपाणी घातले जात असून २००२ मध्ये गोधरा हत्याकांड घडले,२०२३ मध्ये मणिपूरमध्ये नरसंहार झाला.कदाचित ३ डिसेंबरनंतर देशातील कुठल्या ना कुठल्या भागात नरसंहार घडण्याची शक्यता आहे हे लक्षात घ्या असे सूचक विधान प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.जनतेला माझे आवाहन आहे की,देशात भडकवणाऱ्या संघटना बऱ्याच आहेत जे भडकवणारे नेते आहेत त्यांना म्हणा…आधी तुमचा मुलगा पुढे करा मग आम्ही पाठीमागे येतो.स्वत:चे  कुटुंब सुरक्षित ठेवायचे आणि लोकांना पुढे करायचे.स्वत:ला इजा होऊ द्यायच्या नाहीत पण दुसऱ्याला इजा होऊ द्यायच्या अशा भूमिकेपासून आपण सावध राहायला हवे असेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.