Just another WordPress site

“उद्याची सत्ता बदलण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध रहावे”-प्रकाश आंबेडकर यांचे आवाहन

सांगली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

 

दि.३० नोव्हेंबर २३ गुरुवार

 

वंचित बहुजन आघाडीच्या सांगलीमधील सभेत मंचावर महाराष्ट्रातील सर्वच महापुरुषांची प्रतिमा ठेवण्यात आल्या यात छत्रपती शिवाजी महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,छत्रपती शाहू महाराज,महात्मा जोतिबा फुले यांच्यासह टिपू सुलतान यांचीही प्रतिमा ठेवण्यात आली.या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करतांना पोलिसांनी टिपू सुलतान यांच्या प्रतिमेला हार घालू नये असे प्रकाश आंबेडकर यांना सांगितले त्यावर प्रकाश आंबेडकर यांनी काल दि.२९ नोव्हेंबर बुधवार रोजी वंचित बहुजन आघाडीच्या ‘सत्ता संपादन सभेत’ पोलिसांना इशारा दिला असून आम्ही आज टिपू सुलतानच्या प्रतिमेला हार घातला मात्र काहींनी घालू नका असे सांगितले.तुम्ही टिपू सुलतानच्या प्रतिमेला हार घातला तर बघा असा इशारा देण्यात आला होता.माझे पोलीस खात्याला आवाहन आहे की,पाच वर्षांनंतर निवडणुका येतात आणि सरकार बदलत असतात.

आजपर्यंत आम्ही कधीच निवडणुकीच्या माध्यमातून सत्तेत सहभागी होण्याचा प्रयत्न केला नाही मात्र या निवडणुकीत आम्ही सत्तेत गेल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात घ्या.पोलिसांनी घटनेप्रमाणे वागायचे आहे त्यांनी कायद्याप्रमाणे वागायचे आहे.सरकार जे सांगत आहे तसे वागू नका. सरकारला हे नको आहे तसे तुम्ही करत आहात असे मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.उद्याची सत्ता आपल्याला बदलायची आहे व ही सत्ता बदलण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध रहावे तसेच या सभेला उपस्थित आहेत त्या सर्वांनी असा निश्चिय करा की मी माझ्याबरोबर १० मतदार ठेवणार आहे व ते १० मतदार या सरकारच्या विरोधात मतदान करतील आणि सत्तापरिवर्तन घडेल असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी य्यावेळी उपस्थितांना केले.

Leave A Reply

Your email address will not be published.