Just another WordPress site

“शासन आपल्या दारी” योजनेचा कित्ता गिरवीत यावल तहसीलदारांची सातपुड्याच्या अतिदुर्गम भागाला भेट

नवीन मतदार नोंदणी व दुरुस्ती मोहीम राबवून केला श्रीगणेशा

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.१ डिसेंबर २३ शुक्रवार

आगामी काळात होवु घातलेल्या सार्वत्रिक विधानसभा व लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर निवडणुक आयोगाच्यावतीने १ जानेवारी २०२४ पर्यंत ज्या तरूण व तरुणींचे वय १८ वर्ष पुर्ण होणार आहे अशा नागरीकांचे नवीन मतदार नोंदणी मोहीमेत सहभागी करून घेत त्यांना मतदानाचा हक्क प्राप्त करून देण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.सदरील शासनाच्या धोरणाची अंमलबजावणी करीत तसेच “शासन आपल्या दारी” या योजनेचा कित्ता गिरवीत यावल तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी चक्क सातपुड्याच्या अतिदुर्गम भागात असलेल्या जामण्या,गाडऱ्या,उसमळी,लंगडा येथे नुकतीच भेट देऊन नवीन मतदार नोंदणी व मतदार यादी दुरूस्ती मोहीम राबवित अधिकारी वर्ग व जनतेसमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे.प्रसंगी तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी या भागातील आदीवासी बांधवांच्या समस्या व अडी अडचणी जाणून घेतल्या हे विशेष !.

दरम्यान यावल महसुल प्रशासन निवडणुक शाखेच्यावतीने संपुर्ण तालुक्यात विविध गावांमध्ये १ जानेवारी २४ पर्यंत १८ वर्ष पुर्ण झालेल्या तरुणी व तरुणांची नवीन मतदार नोंदणी अभियानास सुरुवात झाली असुन या मतदार नोंदणी मोहीमची शेवटची मुदत ९ डिसेंबर २३ पर्यंत राहणार आहे.याकामी यावल तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी नुकतीच आपल्या महसुल विभागाच्या पथकाकडुन तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या क्षेत्रातील अतिदुर्गम भागातील जामण्या,गाडऱ्या,उसमळी व लंगडाआंबा येथे नवीन मतदार नोंदणीचे अर्ज भरून तसेच मयत झालेल्या मतदारांची नावे कमी करीत संबधीत कुटुंबाकडून अर्ज भरून अधिकारी वर्गाचा कर्तव्यदक्षपणा दाखवून दिला.यावेळी तहसीलदार मोहनमाला नाझिरकर यांच्यासोबत तलाठी टी.सी.बारेला,जामन्या वस्तीचे बिएलओ नरसिंग मोहनसिंग बारेला व गाडऱ्याचे बिएलओ लारसिंग मोहनसिंग बारेला,गाडऱ्याचे पोलीस पाटील तेरसिंग बारेला,जामन्याने पोलीस पाटील छत्तरसिंग बारेला,सरपंच मोतीराम बारेला यांच्यासह आदी महसुल कर्मचारी उपस्थित होते.या अतिदुर्गम क्षेत्रात राहणाऱ्या आदीवासी कुटुंबातील कुटुंबप्रमुख हे कुटुंबाच्या उदरर्निवाहसाठी मोलमजुरी करण्यासाठी दिवसभर बाहेर असतात अशाप्रसंगी तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी आदीवासी बांधव आपल्या हक्कापासुन वंचित्र राहु नये याकरिता पाडयावर संध्याकाळी मुक्कामी राहून नवीन मतदार नोंदणीचे काम पूर्ण करीत आपली जबाबदारी चोख बजावली आहे.सदरहू तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्या या कामगिरीचे आदिवासी पाड्या व वस्त्यांवर विशेष कौतुक केले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.