Just another WordPress site

यावल साने गुरुजी महाविद्यालयात शिष्यवृत्ती परिक्षेबाबत शिक्षकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.३ डिसेंबर २३ रविवार

येथील साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शिष्यवृत्ती परीक्षेबाबत शिक्षकांना मार्गदर्शन व्हावे यासाठी दोन दिवसीय कार्यशाळा गट शिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच मोठ्या उत्साहात संपन्न झाली.सदरील शिष्यवृत्ती परिक्षा संदर्भात आयोजीत कार्यशाळेत इ.५ वी व ८वी शिष्यवृत्ती परीक्षा संदर्भात इ.५ वी व इ.८वी च्या वर्गांना शिकवणाऱ्या  तालुक्यातील शिक्षकांना मार्गदर्शन करण्यात आले.

या कार्यशाळेत परीक्षेचे स्वरूप,प्रश्नपत्रिकांचे स्वरूप,शिष्यवृत्तीमधील फॉर्म भरण्यासंबंधीची माहिती तसेच इंग्रजी अभ्यास कसा सोपा होईल ? विद्यार्थ्यांकडून प्रश्नपत्रिका कशा सोडवाव्या ? प्रश्नपत्रिकांच्या स्वरूपामध्ये २० टक्के झालेला नवीन बदल ज्यांच्यामध्ये दोन पर्याय निवडायचे आहे.सदर कार्यशाळेत उपस्थित शिक्षकांकडून कार्यशाळेस शाळेत चांगला प्रतिसाद मिळाला.यावेळी यावल पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके यांनी दोन्ही दिवस उपस्थित राहून विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम कसा सोपा जाईल याबाबत गणितीय तसेच इंग्रजी विषय विद्यार्थ्यांना सोपा कसा जाईल विषयी मार्गदर्शन केले.तर इंग्रजी विषयासाठी दीपक बारी सत्कार विद्यामंदिर अट्रावल,भाषा विषयासाठी निर्मल चतुर पी.एस.एम.एस.स्कूल बामणोद,गणित विषयासाठी अर्शद पठाण इंदिरा गांधी हायस्कूल यावल यांनी मार्गदर्शन केले.प्रशिक्षणासाठी साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य एम.के.पाटील,गटशिक्षण अधिकारी विश्वनाथ धनके,यावल तालुक्याचे केंद्रप्रमुख शाकीर सर,बी.आर.सी कार्यालयातून वरवटकर यांची प्रमुख उपस्थिती राहिली तसेच तालुक्यातील दोन्ही दिवस शिक्षकांनी चांगला सहभाग नोंदवित कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

Leave A Reply

Your email address will not be published.