गोपाल शर्मा,पोलीस नायक
विदर्भ विभाग प्रमुख
दि.६ डिसेंबर २३ बुधवार
आमदार रविभाऊ राणा व खासदार सौ.नवनीतजी रविभाऊ राणा यांच्या संकल्पनेतून तसेच सुनीलभाऊ राणा मुख्य मार्गदर्शक यांच्या मार्गदर्शनाखाली अमरावती येथे हनुमानगढी हनुमान चालीसा चॅरिटेबल ट्रस्ट द्वारा आयोजित दि.१५ डिसेंबर २३ कलश यात्रा तसेच दि १६ डिसेंबर ते २० डिसेंबर २३ रोजी आंतरराष्ट्रीय कथावाचक पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या शिव महापुराण कथेचे हनुमानगढी छत्रीतलाव रोड अमरावती येथे आयोजन करण्यात आलेले आहे.या शिव महापुराण कार्यक्रमानिमित्त येणाऱ्या लाखो भक्तांच्या सेवेसाठी अमरावती मधील सुप्रसिद्ध तज्ञ डॉक्टर व डॉक्टरांच्या चमू,ॲम्बुलन्स,कार्डियार्ड ॲम्बुलन्स इत्यादी सेवा शिव महापुराण कार्यक्रमासाठी २४ तास निशुल्क मोफत उपलब्ध राहील.या कार्यक्रमानिमित्त आरोग्य यंत्रणेची तयारी जय्यत सुरू आहे.
युवा स्वाभिमान पार्टीचे आरोग्य जिल्हाप्रमुख डॉ.हरिरामजी भांडे तसेच अमरावती शहर प्रमुख अमितजी बिसने व धनंजयजी लोणारे शहर प्रमुख हे कार्यक्रमासाठी येणाऱ्या भक्तांचे आरोग्य सेवेसाठी २४ तास सेवा देण्यास उपस्थित राहतील.कार्यक्रमांमध्ये विविध समित्यांचे गठन करण्यात आलेले असून यामध्ये भोजन समिती,ग्राउंड समिती,आरोग्य समिती इत्यादी समितींचा समावेश करण्यात आला आहे.सदरहू विविध समित्या भक्तांच्या सेवेसाठी कार्यक्रमस्थळी उपस्थित राहतील.दिव्यांग भक्तांसाठी आरोग्य विभागाकडून त्यांना आणण्यासाठी व नेण्यासाठी व्हीलचेअरची व्यवस्था केलेली आहे.कार्यक्रम स्थळ भानखेडा रोड हनुमानगढी छत्रीतलाव अमरावती येथे आहे.आरोग्य सेवेच्या अधिक माहितीसाठी डॉ.हरिरामजी भांडे मो.८३२९६९१०६०,धनंजय लोणारे मो.९७६७०६०२५१,अमितजी बिसने मो.८४२१७७०११२ यांच्याशी अधिक माहिती करिता संपर्क करावा असे आवाहन युवा स्वाभिमान पार्टी तर्फे करण्यात आले आहे.