यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.७ डिसेंबर २३ गुरुवार
काल दि.६ डिसेंबर बुधवार रोजी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस उपस्थितांच्या हस्ते पूजन करून तसेच पुष्पहार अर्पण करीत अभिवादन करण्यात आले.यावेळी तालुक्यातील कोरपावली येथील जिल्हा परिषद मराठी मुलांच्या शाळेतील खोल्यांच्या दुरुस्तीचे काम लवकर सुरू करण्यात यावे याकरिता माजी सरपंच तसेच प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस जलील पटेल यांच्या नेतृत्वाखाली झोपलेल्या अवस्थेत असलेल्या जिल्हा परिषद प्रशासन तसेच पंचायत समिती शिक्षण विभाग यांना जाग यावी यासाठी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी निगडीत असलेल्या शाळेच्या खोल्याची तात्काळ दुरूस्तीचे काम सुरू करावे व या कामास हेतुपुरस्पर दुर्लक्षीत करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांनवर कार्यवाही करण्यात यावी या मागणीसाठी कोरपावली जिल्हा परिषद शाळेच्या आवारात आंदोलनाला सुरुवात करण्यात आली होती.परंतु पंचायत समितीच्या वतीने आज दि.७ डिसेंबर २३ गुरुवार पासुन कामास सुरूवात करण्यात येत असल्याचे आदेश दिल्याने आंदोलची यशस्वी सांगता करण्यात आली.सदरील समस्येबाबत माजी सरपंच तसेच प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस जलील पटेल यांनी हा विषय वेळोवेळी लावून धरल्यामुळे तसेच या समस्यांबाबत शासन स्तरावर वेळोवेळी मागणी केल्यामुळे त्यांच्या प्रयत्नांना यश आले असल्याचे ग्रामस्थांमध्ये बोलले जात आहे.
यावेळी गावचे प्रथम नागरिक सरपंच विलास अडकमोल,व्यस्थापन समिती अध्यक्ष मुनाफ तडवी,उपाध्यक्ष आसिफ पटेल,पोलिस पाटील सलीम तडवी,ग्राम पंचायत सदस्य आरिफ तडवी,युवराज पाटील,अश्रफ तडवी,कोतवाल बबलु महाजन,सलीम तडवी,मोसिन तडवी,पंडित इंधाटे,शाहबाज कुलकर्णी,राजू जहांगीर तडवी,राजू हमीद तडवी,अमान पटेल सह विद्यार्थी,विद्यार्थिनी,पालक व गावकरी वर्ग या आंदोलन प्रसंगी उपस्थित होते.सदर आंदोलनावेळी शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी जोपर्यंत आमच्या शाळेच्या खोल्या दुरुस्तीचे काम सुरू होत नाही तोपर्यंत आम्ही शाळेतुन मिळणारे पोषण आहार घेणार नाही असा पवित्रा घेतला होता अखेर प्रशासनाने या आंदोलनाची दखल घेतल्याने पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी व्ही.सी.धनके व केन्द्र प्रमुख विजय ठाकुर यांनी आंदोलना ठीकाणी भेट देवुन आज दि डिसेंबर गुरुवार पासुन सदरील शाळा दुरुस्तीच्या कामास सुरूवात करण्यासंदर्भातील कार्य आदेश दिल्याने या आंदोलनाची यशस्वी सांगता करण्यात आली. याप्रसंगी विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन तथा कृउबाचे संचालक राकेश फेगडे,सरपंच परिषदचे तालुका अध्यक्ष संदीप सोनवणे, काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी उमेश जावळे,समाजसेवक मुक्तार पटेल यांच्यासह आदी मान्यवरांच्या उपस्थितीत या आंदोलनाची सांगता करण्यात आली.