Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.७ डिसेंबर २३ गुरुवार
दाऊदशी संबंधित सलीम पटेल आणि हसीना पारकर यांच्याशी गोवावाला कपाऊंडच्या जमिनीचा व्यवहार केल्याच्या आरोपात नवाब मलिक यांना तुरुंगवास झाला होता त्यानंतर त्यांना जामीन मंजूर झाला असून हिवाळी अधिवेशनासाठी नवाब मलिक हे नागपूरमध्ये दाखल झाले आहेत.वर्षभराहून जास्त काळ नवाब मलिक तुरुंगात होते.आज ते कुणाच्या गटात जाणार? हे पाहणे महत्त्वाचे असतांना आज ते अजित पवार गटाच्या अनिल पाटील यांच्या कार्यालयात जाऊन बसले.अनिल पाटील आणि धर्मराव बाबा अत्राम यांनी नवाब मलिक हे आमच्याच बाजूने आहेत असा विश्वास व्यक्त केला आहे.हा विश्वास सार्थ ठरवत नवाब मलिक हे सत्ताधारी बाकांवर जाऊन बसले आहेत.नवाब मलिक कुणाबरोबर आहेत याचा खुलासा नवाब मलिकच करतील तसेच ते कुणाच्या बाजूने आहेत हे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष सांगतील.नवाब मलिक सभागृहात जाऊन बसतील त्यानंतर सगळे समजेलच.राष्ट्रवादीचा मुख्य प्रतोद या नात्याने मी २३ नोव्हेंबर रोजी अर्ज दिला होता.विधानमंडळात आम्हाला कार्यालय दिले गेले आहे.अध्यक्षांनी ते कार्यालय दिले आहे असे अनिल पाटील म्हणाले.
आमच्यात गट-तट विषय नाही कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमचाच आहे तसेच नवाब मलिक हे अनिल पाटील यांच्यासहच कार्यालयात बसलेले दिसून आले.नवाब मलिक आमच्यासह सकाळी ११ वाजता राहतील.नवाब मलिक आमच्याबरोबर येणे सकारात्मक असून नवाब मलिक आमच्याबरोबरच आहेत.माझी त्यांची भेट झालेली नाही पण ते आमच्यासह आहेत असे कॅबिनेट मंत्री धर्मरावबाबा अत्राम यांनी स्पष्ट केले आहे.सदरहू हसीना पारकर,सलीम पटेल,१९९३ च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी सरदार खान आणि नवाब मलिक यांनी गोवावाला कंपाउंडमधील मुनीरा प्लंबर या महिलेची तीन एकर जमीन कट रचून बेकायदेशीरपणे हडपल्याचा आरोप असून या महिलेने १९९९ मध्ये सलीम पटेलच्या नावाने पॉवर ऑफ अॅटर्नी जारी केली होती.याद्वारे सलीम पटेलकडून या जमिनीवर असलेल्या बेकायदेशीर अतिक्रमणाबाबत तोडगा काढणे अपेक्षित होते मात्र पटेलने याचा दुरुपयोग करत हसीना पारकरच्या सूचनेनुसार गोवावाला कंपाउंडमधील जमीन मलिक यांच्या सॉलिडस इन्व्हेस्टमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला विकल्याचा आरोप आहे.नवाब मलिक यांनी गोवावाला कंपाउंडमधील जागा भाडे-तत्वावर देऊन त्यातून आलेल्या पैशांमधून वांद्रे,कुर्ला येथील फ्लॅट्स आणि उस्मानाबादमधील शेतजमीन खरेदी केली असल्याचा ईडीचा आरोप आहे तर नवाब मलिक यांनी हे आरोप फेटाळून लावले होते.