यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.९ डिसेंबर २३ शनिवार
येथील माजी नगरसेवक तथा भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष उमेश रेवा फेगडे यांनी पक्षासाठी केलेल्या कार्याची दखल घेत येत्या काळातील होवु घातलेल्या विविध निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर वरिष्ठांच्या वतीने त्यांची पक्षाच्या तालुकाध्यक्षपदी नुकतीच फेरनिवड करण्यात आली आहे.
राज्यात येणाऱ्या आगामी काळात होवु घातलेल्या पंचायत समिती,जिल्हा परिषद,नगर परिषद,विधानसभा आणि लोकसभाच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर भारतीय जनता पक्षाचे जळगाव जिल्हाध्यक्ष अमोल हरिभाऊ जावळे यांनी यावल येथील माजी नगरसेवक तथा पक्षाचे विद्यमान तालुका अध्यक्ष उमेश रेवा फेगडे यांनी पक्षाची धुरा सांभाळतांना आपल्या मागील कार्यकाळात त्यांनी पक्षासाठी केलेल्या विशेष कार्याची दखल घेत त्यांची भारतीय जनता पक्षाच्या यावल तालुका अध्यक्षपदी नुकतीच फेरनिवड केली आहे.उमेश फेगडे यांच्या निवडीचे महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री ना.गिरीषभाऊ महाजन,रावेर लोकसभेच्या खासदार रक्षाताई खडसे,लोकसभा निवडणुकीचे प्रभारी नंदकिशोर महाजन,जळगाव जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल चौधरी,जिल्हा उपाध्यक्ष शरद महाजन,जिल्हा सरचिटणीस हर्षल पाटील,किसान मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष नारायण चौधरी,तालुका सरचिटणीस विलास चौधरी,उज्जैनसिंग राजपुत,जिल्हा परिषदच्या माजी सदस्या सविता भालेराव,डॉ.कुंदन फेगडे,भाजयुवा मोर्चाचे राकेश फेगडे व तालुका अध्यक्ष सागर कोळी यांच्यासह पक्षातील विविध पदाधिकारी यांनी स्वागत केले आहे.