डॉ.सतीश भदाणे,पोलीस नायक
चोपडा तालुका (प्रतिनिधी) :-
दि.११ डिसेंबर २३ सोमवार
७ वर्षीय बालिकेला टीव्ही दाखविण्याच्या बहाण्याने घरी नेत एका ५५ वर्षीय नराधमाने अश्लिल चाळे केले.याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात मुलीच्या वडिलांच्या फिर्यादिवरून सदरील आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी या आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की,तालुक्यातील एका गावात आरोपी अशोक देवराम पाटील वय ५५ वर्ष या नराधामाने काल दि.१० डिसेंबर रविवार रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास ७ वर्षीय बालिकेला टीव्ही बघण्याचे आमिष दाखवत घरात घेऊन जाऊन लैंगिक इच्छेच्या उद्देशाने अश्लिल चाळे केल्याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्यादीचे वडील यांच्या फिर्यादी वरून भांदवी कलम ३५४, ३५४ (अ), यासह बाल लैंगिग अत्याचार कायदा कलम २०१२ चे कलम ८,१२ व अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा, १९८९ सुधारित अधिनियम सन २००५ च्या कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल नंदवाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली चोपडा पोलीस निरीक्षक के.के.पाटील,चोपडा ग्रामीणचे सहायक पोलिस नरीक्षक एस. एल.नितनवरे हे करीत आहेत.