Just another WordPress site

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसऱ्या टी-२० सामन्यात तब्बल १३ विक्रमांची नोंद

गुवाहाटी-पोलीस नायक(क्रिकेट न्युज):-भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात तब्बल १३ विक्रमांची नोंद नोंद करण्यात आली.हा सामना भारताने १६ धावांनी जिंकला.या सामन्यात झालेल्या १३ विक्रमांची तपशीलवार माहिती पुढीलप्रमाणे आहे.

घरच्या मैदानावर प्रथमच विजय:-भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ३ सामन्यांची मालिका जिंकली. गुवाहाटी येथे झालेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताने १६ धावांनी विजय मिळवला.भारताने घरच्या मैदानावर प्रथमच दक्षिण आफ्रिकेचा टी-२० मालिकेत पराभव केला.या सामन्यात १३ मोठे विक्रम झाले.

​विराट कोहलीच्या ११ हजार धावा:-विराट कोहलीने टी-२० क्रिकेटमध्ये ११ हजार धावा पूर्ण केल्या.अशी कामगिरी करणारा तो भारताचा पहिला आणि जगातील चौथा फलंदाज ठरला आहे.याआधी क्रिस गेल, पोलार्ड, शोएब मलिक यांनी अशी कामगिरी केली आहे.
​डेव्हिड मिलर:-दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज डेव्हिड मिलरने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दुसरे शतक पूर्ण केले.या प्रकारात त्याने २ हजार धावांचा टप्पा देखील पार केला.
​विक्रमी भागिदारी:-मिलर आणि डीकॉक यांच्यात चौथ्या क्रमांकासाठी १७४ धावांची भागिदारी झाली. टी-२० क्रिकेटमध्ये भारताविरुद्ध झालेली ही सर्वोच्च भागिदारी आहे.
​रोहित शर्मा:-कर्णधार म्हणून रोहित शर्माने कॅलेंडर वर्षात ५०० धावा पूर्ण केल्या.अशी कामगिरी करणारा तो भारताचा पहिला कर्णधार ठरला आहे. विराट कोहलीने २०१९ साली ४६६ धावा केल्या होत्या.
टी-२० मध्ये असे प्रथमच घडले:-दक्षिण आफ्रिकेच्या जलद गोलंदाजांनी या सामन्यात २०१ धावा दिल्या आणि त्यांना एकही विकेट घेता आली नाही.आयसीसीच्या पूर्ण सदस्य असलेल्या देशाने टी-२० क्रिकेटमध्ये १५० हून अधिक दावा देत एकही विकेट न घेण्याची ही पहिलीच वेळ आहे.
​विराट कोहली:-विराट कोहली या सामन्यात ४९ धावांवर बाद झाला.आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये दुसऱ्यांदा तो ४९ धावांवर बाद झाला. दोन वेळा अर्धशतक हुकणारा तो पहिलाच भारतीय ठरला आहे.
​रोहित आणि राहुल:-रोहित शर्मा आणि केएल राहुल यांच्यात आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये १०व्यांदा ५० पेक्षा अधिक धावांची भागिदारी झाली. रोहितने शिखर धवन सोबत देखील अशी कामगिरी केली आहे. दोन सलामीवीरांसोबत ५० हून अधिक धावांची भागिदारी करणारा तो पहिला भारतीय ठरला आहे.
​एका वर्षात ५० षटकार:-सूर्यकुमार यादवने २०२२ या वर्षात आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये ५० षटकार मारले आहेत.अशी कामगिरी करणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे.
​दुसऱ्या क्रमांकाचे वेगवान अर्धशतक:-सूर्यकुमार यादवने १८ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले.आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये भारताकडून हे दुसऱ्या क्रमांकाचे वेगवान अर्धशतक ठरले. याआधी केएल राहुलने १८ चेंडूत ५० धावा केल्या होत्या.या यादीत युवराज सिंग अव्वल स्थानावर असून त्याने १२ चेंडूत अशी कामगिरी केली आहे.
​मॅक्सवेलचा विक्रम मोडला:-आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सूर्यकुमार यादवने कमीत कमी चेंडूत १ हजार धावा करण्याचा विक्रम केला. त्याने ५७३ चेंडूत ही कामगिरी केली. याआधीचा विक्रम मॅक्सवेलच्या नावावर होता, त्याने ६०४ चेंडूत अशी कामगिरी केली होती.
​मोठी धावसंख्या:-भारताने ३ बाद २३७ अशी धावसंख्या उभी केली. द.आफ्रिकेविरुद्ध कोणत्याही संघाने केलेली ही सर्वोच्च धावसंख्या आहे.
​४०० सामने:-रोहित शर्माने टी-२० क्रिकेटमध्ये ४०० सामन्यांचा टप्पा पार केला.अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय ठरला आहे.
​पराभव झालेल्या सामन्यात:-डेव्हिड मिलरने नाबाद १०६ धावा केल्या आणि तरी देखील आफ्रिकेचा पराभव झाला.आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये पराभव होणाऱ्या संघाकडून खेळण्यात आलेली ही दुसऱ्या क्रमांकाची मोठी धावसंख्या आहे. केएल राहुलने नाबाद ११० धावा करून देखील भारताने मॅच गमावली होती.
Leave A Reply

Your email address will not be published.