यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१३ डिसेंबर २३ बुधवार
महाराष्ट्र राज्याचे अभ्यासु व आश्वासक नेते आणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष पद्मविभूषण खासदार शरद पवार यांच्या ८४ व्या वाढदिवसानिमित्त यावल तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने यावल ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना काल दि.१२ डिसेंबर रोजी फळवाटप करण्यात आले.
यावेळी रावेर लोकसभा संपर्क प्रमुख अतुल पाटील,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रा.मुकेश येवले,जिल्हा परिषदचे माजी गटनेते व राष्ट्रीय काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रभाकर सोनवणे,राष्ट्रवादी युवकचे तालुका अध्यक्ष पवन पाटील,विजय पाटील,सुखदेव बोदडे,शहर अध्यक्ष करीम मनियार,यावल नगर परिषदचे माजी नगराध्यक्ष राकेश कोलते,सामाजीक न्याय विभागाचे तालुका अध्यक्ष अरुण लोखंडे,हाजी युसूफ खान, अय्युब खान,किरण पाटील,बापु जासुद,कार्याध्यक्ष मोहसीन खान,रोहन महाजन,अन्सार भाई,अँड निवृत्ती पाटील,पितांबर महाजन,नानाजी पाटील,आरिफ खान,आबीद कच्ची,काँग्रेस पक्षाचे अनिल जंजाळे,शरीफ तडवी,दीपक तडवी,जाहिद कुरेशी,ललित तेली,नथ्थु पाटील,यशवंत पाटील,भैय्या पाटील,गिरीश पाटील यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.