राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याबाबत फडणवीसांनी केले मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांनाच लक्ष्य
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले असून महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आल्याचे पाहायला मिळत आहे.मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला असतांनाच राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष आनंद निरगुडेंनी राजीनामा दिल्यामुळे यावर सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण पाहायला मिळत आहे.यासंदर्भात मागासवर्ग आयोगाचे माजी सदस्य बालाजी किल्लारीकर यांनी केलेल्या दाव्यावरून राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.त्यासंदर्भात विचारणा केली असता देवेंद्र फडणवीसांनी गंभीर दावा केला आहे.नागपुरात देवेंद्र फडणवीसांना प्रसारमाध्यम प्रतिनिधींनी राज्य मागासवर्गाचे माजी सदस्य किल्लारीकर यांच्या एका विधानाबाबत विचारणा केली असता देवेंद्र फडणवीसांनी त्यावर प्रतिक्रिया दिली असून बालाजी किल्लारीकर यांनी एकनाथ शिंदेंच्या मराठा आरक्षणासंदर्भातील भूमिकेला देवेंद्र फडणवीसांनी विरोध केल्याचा दावा केल्याबाबत पत्रकारांनी विचारणा केली असता त्यावर फडणवीसांनी मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांनाच लक्ष्य केले आहे.