यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१६ डिसेंबर २३ शनिवार
येथील शहरातील शिवसेनेचे निष्ठावंत व एकनिष्ठ कार्यकर्ते डॉ.विवेक अडकमोल यांची उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेने युवा शाखेच्या तालुका युवा अधिकारीपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे.
शिवसेना (उबाठा) चे पक्ष प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली व युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली युवा सेनेच्या पदधिकाऱ्यांची निवड नुकतीच जाहीर करण्यात आली असुन यात यावल येथील शिवसेनेचे युवा कार्यकर्ते डॉ.विवेक अडकमोल यांची युवा सेनेच्या तालुका अधिकारीपदी निवड करण्यात आली आहे.डॉ.विवेक अडकमोल यांच्या निवडीचे जगदीश कवडीवाले,शरद कोळी,कडू पाटील,गोपाळ चौधरी,सुनिल बारी,संतोष खर्चे,पप्पु जोशी,योगेश चौधरी,सारंग बेहडे,मयुर खर्चे,अजहर खाटिक,सागर देवांग,आर. के.चौधरी,आदीवासी सेनेचे हुसेन तडवी,विजय पंडीत,लोणारी यांच्यासह शिवसेना (उबाठा )च्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकारी यांनी स्वागत केले आहे.