यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२० डिसेंबर २३ बुधवार
येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग,रेड रिबन क्लब व ग्रामीण रुग्णालय यावल यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक एड्स जनजागृती पंधरवाडा निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी महाविद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन प्र.प्राचार्या डॉ.संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतेच करण्यात आले.
यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात उपप्राचार्य प्रा.एम.डी.खैरनार व प्रा.ए.पी.पाटील,ग्रामीण रुग्णालय यावल येथील पर्यवेक्षक निलेश दांडवेकर, लॅब टेक्निशियन रवी माळी,समुपदेशक कांचन चौधरी,लिंक वर्कर पवन जगताप आदींची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमात पवन जगताप व निलेश दांडवेकर यांनी आपल्या मार्गदर्शनात एड्स व एच आय व्ही फरक काय आहे? हे विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.एड्स व एच आय व्ही बाधित होण्याची कारणे व उपाय याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.एड्स हा आजार संसर्गजन्य नसून व्यसनाधीनता व असुरक्षित सबंध यांच्यापासून होतो.एड्सबाबत जनजागृती व गैरसमज समाजातून काढणे हा मुख्य उद्देश आहे.एड्स व एचआयव्ही यांचे उपचार शासकीय रुग्णालया मार्फत मोफत केले जातात.खाजगी रुग्णालयात उपचार घेणे सामान्य माणसाला न पडणारे आहे असेही त्यांनी सांगितले.सदर
कार्यक्रमात कु.गायत्री देविदास पाटील (एस वाय बीएस्सी)हिने एड्स संदर्भातील विषयांवर जनजागृती बाबत शपथ विद्यार्थ्यांकडून घेतली तसेच या कार्यक्रमात पोस्टर प्रदर्शन ठेवण्यात आले होते.विद्यार्थ्यांनी या पोस्टर प्रदर्शनाबाबत विविध प्रश्न विचारून आपले गैरसमज दूर केले.या प्रदर्शनात बहुसंख्य विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ.आर.डी.पवार यांनी केले तर आभार प्रा.सुभाष कामडी यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ.एस.पी.कापडे,डॉ.हेमंत भंगाळे,डॉ.पी.व्ही.पावरा,प्रमोद कदम,अनिल पाटील,प्रमोद जोहरे,अमृत पाटील,केशव काटकर व सुदीप बडगुजर यांनी परिश्रम घेतले.