यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२१ डिसेंबर २३ गुरुवार
तालुक्यातील कोरपावली येथील डी.एच.जैन विद्यालयात इयत्ता १० वी मार्च २०२४ साठी कॉपीमुक्त परीक्षा अभियान अंतर्गत पालक सभेचे नुकतेच आयोजन करण्यात आले.सदरील पालक सभा विद्यार्थी व पालकांच्या विशेष सहकार्यातून मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
यावेळी सभेच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच जलीलदादा पटेल होते.प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष जलिलदादा पटेल यांनी विद्यार्थ्यांना कॉपीमुक्त पेपर लिहण्याचे फायदे याबाबत मार्गदर्शन केले.दरम्यान शिक्षकांनी सदर अभियानाबद्दल व नियोजनाबद्दल इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांना कॉपीमुक्त परिक्षा,बोर्डाचे पेपर कसे सोडवायचे व प्रश्न कसे लिहायचे तसेच १० टक्के गुण मागच्या वर्षापेक्षा जास्त मिळवणेसाठी विद्यार्थ्यांनी भरपूर अभ्यास आणि सराव करावा त्याचबरोबर सुट्या लागतील तरी विद्यार्थाना काही अडचण आल्यास त्यांनी शाळेत यावे नक्कीच आम्ही सहकार्य करू असे आश्वासन शिक्षकांनी दिले.यावेळी उपस्थित पालकांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.सदर कार्यक्रमास मुख्याध्यापिका सी.व्ही.नेहेते,अर्चना महाजन,दिलीप पाटील तसेच पालक दयाराम सोनवणे,फारुख पटेल,भीमराव इंधाटे,अशोक भालेराव, मजित तडवी,आशा तायडे,सुनील महाजन यांच्यासह विद्यार्थी व विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.