Just another WordPress site

डोंबिवली येथे संत गाडगेबाबा यांच्या स्मृती प्रित्यर्थ स्वच्छता अभियान

मिनाक्षी पांडव-पोलीस नायक

मुंबई विभागीय प्रमुख

दि.२१ डिसेंबर २३ गुरुवार

कल्याण-डोंबीवली महानगरपालिका काल दि.२० डिसेंबर बुधवार रोजी डोबीवली शाखेतर्फे संत गाडगे महाराज यांच्या स्मृती प्रीत्यर्थ येथील रिजन्सी सिनिअर सिटीझन ग्रुपच्या वतीने स्वच्छता अभियान कार्यक्रम राबवून अनोख्या रीतीने संत गाडगेबाबा यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.

यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात काल दि.२० डिसेंबर बुधवार रोजी रिजन्सी सिनिअर सिटीझन ग्रुप पदाधिकारी डिगंबर तायडे,मोहन बडगूजर,प्रकाश कुलकर्णी,जयवंत दुधमांडे,सुभाष काफरे,विलास नरे,शांताराम सोनवणे,विलास तोंडे,व्रुषाली टीकेकर,शकुंतला तायडे,प्रतीभा पाटील आणि इतर रिजन्सी सीनीयर सीटीझन ग्रुप परीवारातर्फे डोंबीवली पुर्व तील एमआयडीसी भागात स्वच्छता मोहीम राबवून रस्ते व आजूबाजूचा परीसर स्वच्छ करून कार्यक्रम राबविणेत आला.यावेळी सर्व वरिष्ठ  नागरीक पुरूष व महीला यांनी हीरीरीने भाग घेवून आपले कर्तव्य पार पाडून संत गाडगे बाबा यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.प्रसंगी जेष्ठ पुरुष व महीलांचा उत्साह हा वाखाणण्याजोगा होता हे विशेष !

Leave A Reply

Your email address will not be published.