यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२२ डिसेंबर २३ शुक्रवार
येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने संसदेत लोकशाहीचा आवाज दडपण्यासाठी केन्द्र सरकारच्यावतीने विरोधी पक्षाच्या खासदारांना संसदच्या सत्रातुन निलंबीत केल्याच्या निषेर्धात मोर्चाचे आयोजन करून केंद्र सरकारचा निषेध नोंदविण्यात आला.त्याचबरोबर अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या १३८ व्या वर्धापन दिनानिमित्त नागपूर येथे खासदार सोनिया गांधी,राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिका अर्जून खरगे व युवकांचे प्रेरणास्थान खा. राहुल गांधी यांच्यासह आदी मान्यवरांच्या उपास्थित पक्षाची भव्य सभा आयोजीत करण्यात आली असुन त्यानिमित्ताने या सभेच्या नियोजना साठीची बैठक यावल रावेरचे आ.शिरीष चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच संपन्न झाली.
यानिमित्ताने आयोजित यावल तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या सभागृहात पार पडलेल्या पक्षाच्या महत्वपुर्ण बैठकीत तालुका काँग्रेसचे कमेटीचे अध्यक्ष प्रभाकर सोनवणे यांच्यासह बैठकीत जि.पि.पाटील,मारूळचे सैय्यद जावेद अलीजनाब,संघाचे चेअरमन अमोल भिरुड, काँग्रेसचे शहराध्यक्ष कदिर खान,काँग्रेस कमेटीचे प्रदेश सरचिटणीस जलील पटेल,वढोदे गावाचे सरपंच संदीप सोनवणे,अजय अडकमोल, मारूळचे सरपंच असद सय्यद,माजी नगरसेवक शेख असलम,माजी नगरसेवक मनोहर सोनवणे,समीर मोमीन,गुलाम रसुल मेंबर,युनूस पिंजारी,पक्षाच्या अनुसुचित जाती विभाग तालुका अध्यक्ष अनिल जंजाळे,युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष फैजान शाह,इम्रान पहेलवान,अनिल पाटील,बोदडे नाना,अभय महाजन,अमर कोळी,धीरज पाटील,धीरज कुरकुरे,विक्की गजरे,पुंडलिक बारी,नईम शेख,काँग्रेसच्या आदीवासी विभागाचे तालुकाध्यक्ष बशीर तडवी,रियाज शेख,टीनु सोनार,झिया सर,समाधान पाटील,पिरण तडवी,प्रशांत पाटील,शरद पाटील,सुनील पाटील,अशोक तायडे,कबीर मेंबर,शेख सकलेन यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर बैठकीनंतर बुरुज चौकात केंद्र सरकारने विरोधी पक्षाच्या खासदारांना निलंबित करण्यात आल्याच्या निषेधार्थ केन्द्र शासनाच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.प्रसंगी आ.शिरीष चौधरी हे विधानसभा क्षेत्रातील सर्वांच्या आशीर्वादाने मोठ्या आजारातून सुखरूप आल्याबद्दल त्यांचे स्वागत करण्यात आले.यावेळी काँग्रेस पक्षाच्या विविध सेलच्या पदाधिकाऱ्यांची निवड झाल्याबद्दल स्वागत सत्कार करण्यात आले.प्रसंगी तालुक्यातील अनेक जणांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला त्यांचे देखील स्वागत बैठकीत करण्यात आले.बैठकीत तालुक्यातील पाडळसा येथील काँग्रेसचे जेष्ठ नेते डॉ.प्रमोद इंगळे यांचे दुःखद निधन झाल्याने बैठकीच्या सुरवातीला पक्षाच्या वतीने त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.या बैठकीचे सूत्रसंचालन गणेश गुरव यांनी तर उपस्थितांचे आभार शहरध्यक्ष कादिर खान यांनी मानले.