Just another WordPress site

अंजाळे गावाजवळील मोर नदीच्या पुलावर झालेल्या अपघातात तरुणाचा मृत्यु

यावल-पोलीस नायक  (प्रतिनिधी) :-

दि.२३ डिसेंबर २३ शनिवार

यावल-भुसावळ मार्गावरील अंजाळे घाटाच्या पुलावर मोटरसायकल व चारचाकी वाहनाचा भिषण अपघात होवुन एक जण जागीच ठार झाल्याची नुकतीच घटनासमोर आली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की,यावल-भुसावळ मार्गावरील अंजाळे घाटाच्या मोरनदी वरील नवीन बांधलेल्या उडान पुलावर काल दि.२२ रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास यावलकडुन भुसावळकडे जाणाऱ्या मारूती ईको या चार चाकी वाहन क्रमांक एमएच ०१ सिपी ३२१८ या वाहनाची भुसावळकडून येणाऱ्या मोटरसायकल क्रमांक एमएच १९ ईडी ०४३२ यात भिषण अपघात झाल्याने मोटरसायकल चालक राजु भिका शिंदे वय ३o वर्ष राहणार देऊळगाव गुजरी तालुका जामनेर यास गंभीर दुखापत होवुन तो जागीच मरण पावल्याची घटना घडली आहे.याबाबत विकास विश्वनाथ शिंदे वय २५ बर्ष राहणार आमोदे तालुका यावल याने अपघाताची फिर्याद दिल्याने यावल पोलीस ठाण्यात अपघातास व मोटरसायकल चालक राजु शिंदे यांच्या मृत्युस कारणीभुत मारूती ईको वाहन चालक सचिन संजय कोळी राहणार अंजनसोडा तालुका भुसावळ यांच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.