Just another WordPress site

नाफेडतर्फे बाजारभाव तूर खरेदीसाठी कोरपावलीसह तिन केंद्रांचा समावेश

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.२५ डिसेंबर २३ सोमवार

नाफेडच्या वतीने पीएसएफ योजनेंतर्गत पणन महासंघाच्या संस्थांकडून खरेदी करण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील तीन केंद्रांना परवानगी मिळाली असून विशेष म्हणजे शासन यंदा प्रथमच हमी भावात नव्हे तर बाजारभावात तूर खरेदी करणार असल्याने शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे.यात नाफेड अंतर्गत तूर खरेदीसाठी जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील कोरपावली विकासो,अमळनेर तालुका शेतकरी सहकारी संघ,एरंडोल शेतकरी संघाच्या धरणगाव या केंद्रांना परवानगी देण्यात आली असून शेतक-यांची नावे नोंदणी करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत.तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांची नोंदणी करावी असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी जी.एन.मगरे यांनी केले आहे.

खरीप पिकांच्या भरड धान्याचा बाजारभाव हमीभावापेक्षा जास्त असल्याने ज्वारी,मका आणि बाजरीच्या शासकीय खरेदीकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली होती म्हणून शासनाने आता खरीप कडधान्य यावर्षी नाफेड दररोज बाजारभाव सकाळी खरेदी केंद्रांना कळवेल त्याच दराने तूर खरेदी केली जाईल त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नोंद करून या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जी.एन.मगरे जिल्हा मार्केटिंग अधिकारी जळगाव यांनी केले आहे.शेतकऱ्यांची खरेदीसाठी नोंद झाली असेल तर त्याने इतर कागदपत्रे देण्याऐवजी फक्त पीकपेरा असलेला सातबारा उतारा जोडावा लागणार आहे.नवीन शेतकऱ्यांना मात्र आधार कार्ड,अचूक बँक खाते आणि ऑनलाईन पीक पेरा असलेला उतारा जोडणे आवश्यक असेल.हमीभावा पेक्षा बाजार भावाने खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे शेतकऱ्यांना लाभ होईल आणि व्यापाऱ्यांमध्ये चुरस निर्माण होवुन शेतकऱ्यांना याचा फायदा होईल.तुरीचा हमीभाव शासनाने ७ हजार रुपये प्रति क्विंटल जाहीर केला आहे असे जिल्हा पणन अधिकारी जी.एन.मगरे यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.