यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२६ डिसेंबर २३ मंगळवार
तालुक्यातील सावखेडासिम येथील गटारीत कुणीतरी अनोळखी व्यक्तीने स्त्री जातीचे अर्भक सोडून दिल्याची घटना उघडकीस आली असुन पोलिसांनी अर्भकास ताब्यात घेत वैद्यकीय तपासणीसाठी जळगाव येथे पाठविले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,तालुक्यातील सावखेडासिम येथे काल दि.२५ डिसेंबर सोमवार रोजी गावातील एका व्यक्तीस कुणीतरी अपुर्ण दिवसाचे स्त्री जाती मृत अर्भक टाकुन दिल्याचे दिसले.दरम्यान तत्काळ त्यांनी गटारीतून हा ब्रक बाहेर काढला व पोलीस पाटील पंकज बडगुजर यांना सांगितले आणि याबाबत यावल पोलिसात दूरध्वनीद्वारे सुद्धा कळविण्यात आले.सदर अर्भक स्त्री जातीचे असून ते पाच ते सहा महिन्याचे असावे असा अंदाज ग्रामस्थांकडून काढला जात आहे.सदरचे असे हे घाणिरडे कृत्य करणाऱ्या नराधमास किंवा त्या अज्ञात महिलेचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी गावकरी करीत आहे.दरम्यान हा प्रकार पाहण्यासाठी सावखेडासिम गावातील ग्रामस्थांनी मोठया प्रमाणावर घटनास्थळी गर्दी केली होती.सावखेडासिम गावात सकाळी आठ वाजेच्या सुमारास ही घटना निदर्शनास आली.यावेळी पोलीस पाटील पंकज बडगुजर यांनी यावल पोलीस ठाण्यात माहिती कळविल्यावर पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या आदेशावरून तात्काळ घटनेचे गांभींय लक्षात घेत सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे व हेकॉ राजेन्द्र पवार यांनी सावखेडा सिम येथे घटनास्थळी भेट देत मृत अर्भकास पंचमाना करीत ताब्यात घेतले आहे.दरम्यान अशा प्रकारे मृत अर्भक फेकुन दिल्याची दोन महीन्यातील दुसरी घटना असुन हा मोठा चर्चचा विषय बनला आहे.सदरहू सदरील अर्भकास पोलिसांनी ताब्यात घेत वैद्यकीय तपासणीसाठी जळगाव येथे पाठविले आहे.