साहित्य संमेलनासाठी प्रशासन अलर्टमोडवर;जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा
प्रशासनातर्फे समन्वय अधिकारी म्हणून प्रातांधिकारी महादेव खेडकर यांची नियुक्ती
साने गुरुजी साहित्य नगरी,अमळनेर
पोलीस नायक तालुका (प्रतिनिधी) :-
दि.२६ डिसेंबर २३ मंगळवार
९७ वे मराठी साहित्य संमेलन २,३ व ४ फेब्रुवारी २०२४ रोजी अमळनेर येथील पू.साने गुरुजी साहित्य नगरी प्रताप महाविद्यालयात होत आहे. साहित्य संमेलनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज दि.२६ डिसेंबर मंगळवार रोजी अमळनेर येथे संमेलनाच्या विविध ठिकाणी जावून प्रत्यक्ष पाहणी केली यानंतर त्यांनी पीडब्लूडी,तहसील,पाेलीस,एमएसईबी,नगरपालिकेसह संबंधित सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेत जबाबदाऱ्या निश्चित केल्या.संमेलनासाठी प्रशासनातर्फे प्रातांधिकारी महादेव खेडकर यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली.संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा राज्याचे ग्रामविकास व पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांनी रविवारी संमेलनाचा आढावा घेतला होता त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना फोन करुन काही सुचना दिल्या होत्या.त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज प्रताप महाविद्यालयास भेट दिली.यावेळी त्यांनी अमळेनर येथील सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याच्या सुचना दिल्या होत्या.सर्व अधिकाऱ्यांसोबत जिल्हाधिकाऱ्यांनी संमेलनाच्या सर्व कार्यक्रमस्थळांना भेटी देत पाहणी केली.
त्यानंतर प्रताप महाविद्यालय अमळनेर येथे झालेल्या बैठकीत कोणत्या विभागाने कोणती कामे करावी हे निश्चित करुन जबाबदाऱ्यांचे वाटप करण्यात आले.यावेळी प्रातांधिकारी महादेव खेडकर यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली.तयारीचा सर्व आढावा घेवून चार दिवसात अहवाल देण्याच्या सुचना अधिकाऱ्यांना दिल्या.साहित्य संमेलन यशस्वी होण्यासाठी प्रशासन सर्वोतोपरी सहकार्य करेल असे आश्वासन म.वा.मंडळाचे अध्यक्ष डॉ.अविनाश जोशी यांना दिले.या बैठकीला संमेलनाचे महाव्यवस्थापक बजरंग अग्रवाल,मराठी वाङ्मय मंडळाचे उपाध्यक्ष श्यामकांत भदाणे,रमेश पवार,कार्यवाह नरेंद्र निकुंभ,शरद सोनवणे,कोषाध्यक्ष प्रदीप साळवी,कार्यकारी सदस्य प्रा.डॉ.पी.बी.भराटे, बन्सीलाल भागवत,स्नेहा एकतारे,संदीप घोरपडे,वसुंधरा लांडगे,भैय्यासाहेब मगर,प्रा.डॉ.सुरेश माहेश्वरी,प्रा.श्याम पवार,प्रा.शीला पाटील,अजय केले,खान्देश शिक्षण मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र झाबक,उपाध्यक्ष जितेंद्र देशमुख,माधुरी पाटील,कार्याध्यक्ष डॉ.अनिल शिंदे,कार्यउपाध्यक्ष प्रदिप अग्रवाल,सदस्य हरी वाणी,डॉ.संदेश गुजराथी,कल्याण पाटील,विनोद पाटील,निरज अग्रवाल,योगेश मुंदडे,चिटणिस प्रा.डॉ.ए.बी.जैन, सहचिटणिस प्रा.डॉ.डी.आर.वैष्णव,प्रा.आर.एम.पारधी,विनोद मधुकर पाटील तसेच प्रांताधिकारी महादेव खेडकर,अमळनेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे,श्री.गायकवाड यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.