Just another WordPress site

आम्हाला आमंत्रण मिळो अथवा न मिळो,आम्ही गतवर्षीप्रमाणे तिथे नतमस्तक व्हायला अगोदर जायचो तसे भविष्यात जाणार !

ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांची राम मंदिर उद्घाटन सोहळ्याबाबत स्पष्टोक्ती

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.२६ डिसेंबर २३ मंगळवार

राम मंदिर उद्घाटन सोहळा दि.२२ जानेवारी २०२४ रोजी आयोजित करण्यात आला असून देशभरातील हजारो प्रतिष्ठित नागरिकांना या उद्घाटनाचे आमंत्रण देण्यात आले आहे परंतु महाराष्ट्रातून उद्धव ठाकरेंना आमंत्रण दिलेले नाही.यावरून ठाकरे गटाने सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे परंतु यावरून ठाकरे गटाची अधिकृत भूमिका समोर आली नव्हती तसेच गिरीश महाजन यांनीही राम मंदिराच्या उभारणीत ठाकरे गटाचे योगदान काय असा सवाल विचारला तर उद्धव ठाकरे हे सरकारच्या व्हीव्हीआयपी यादीत नसल्याने त्यांना आमंत्रण मिळाले नसेल असेही म्हणाले यावरून ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली आहे.आम्हाला निमंत्रण येवो अथवा न येवो तो आमच्यासाठी आस्थेचा विषय आहे.इव्हेंट करणारी जी लोक आहेत त्यांनी त्या काळात पळपुटेपणा केला ज्यांना लालकृष्ण अडवाणींची आठवण होत नाही विश्वहिंदू परिषदेचा उल्लेख होत नाही अशा लोकांकडून आम्ही काय अपेक्षा करायची? असे सचिन अहिर म्हणाले.राम मंदिर त्यांनी घडवलेले नाही.राजकीय पक्ष म्हणून बाळासाहेब ठाकरेंनी परखड भूमिका मांडली होती.या विषयाला चालना देऊन सांगितले होते की लोकसभेत हे बिल आणा.सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर हा तिढा सुटलेला आहे परंतु आता इव्हेंट करत आहेत जसे काय यांनीच तिथे जाऊन विटा लावल्या आहेत.आम्हाला अभिमान आहे की राम मंदिर उभे राहतय मात्र आम्हाला आमंत्रण मिळो अथवा न मिळो आम्ही गतवर्षीप्रमाणे तिथे नतमस्तक व्हायला अगोदर जायचो तसे भविष्यात जाणार आहोत असे सचिन अहिर यांनी स्पष्ट केले आहे.

 

जे सांगत आहेत की आम्ही छातीवर बसून राम मंदिर बांधले आहे त्यांची ५६ इंची छाती त्यावेळी (बाबरी मशीद पाडताना) कुठे होती? जर बाबरी मशीदीवर हल्ला झाला असेल आणि तो माझ्या लोकांनी केला असेल तर मला त्यांचा अभिमान आहे असे बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते हे सांगण्याचे धाडस आहे का कोणत्या पक्षात? राम मंदिर उभे राहणे हा देशाचा स्वाभिमान आहे.देशाची आस्था आहे.या आस्थेला राजकीय वळण देण्याचे काम होत आहे.सातत्याने आमचे खच्चीकरण करण्याचा केविलवाणा प्रयत्न होतोय हे जनतेला माहित आहे असेही सचिन अहिर म्हणाले.राजकीय पक्ष म्हणून सर्वांत पहिली एक कोटींची देणगी शिवसेना प्रमुखांनी त्यावेळी दिली होती त्याची किंमत आज किती येईल हे सांगता येणार नाही परंतु राम मंदिराच्या निर्माणाकरताही आमचे मोठे योगदान होते असेही अहिर यांनी स्पष्ट केले.विश्व हिंदू परिषदेचे अशोक सिंघल मातोश्रीवर येऊन बाळासाहेबांकडून सल्ला घ्यायचे.आज आम्हाला डावललण्याचा प्रयत्न करत असतील तर ठीक आहे असे ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.